नवीन लेखन...

टॉवर संस्कृती

Tower Culture in the World

सध्या जगभरच्या मोठमोठ्या शहरात अुंचच अुंच इमारती…टॉवर्स बांधले जात आहेत. त्यांचे आयुष्य किती असावे? दोनशे.. तीनशे…हजार वर्षे? आपल्या हयातीत हे टॉवर्स कोसळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे, सध्या या अिमारती वापरात आहेत.

पिरॅमिडसारख्या अती प्राचीन अिमारती अजूनही उभ्या आहेत. ग्रीक आणि रोमन संस्कृतीतल्याही बर्याीच अिमारती ऊनवारापाऊस यांच्याशी सामना देतउभ्या आहेत. रामायण-महाभारत काळातली मात्र एकही वास्तू अस्तित्वात नाही. लेणी, प्राचीन मंदिरे, देवळे, ताजमहाल वगैरे सारख्या वास्तू अजूनही, त्या काळाच्या भरभराटीची साक्ष देत उभ्या आहेत.

टॉवर्स बांधतांना कॉँक्रीटला मजबुती देण्यासाठी पोलादी सळया वापरतात. सध्या असा अनुभव आहे की, पन्नास-साठ वर्षात या सळया गंजतात. त्यामुळे इमारतीचे खांब आणि बीम तडकून इमारत कमजोर होते. दुरुस्ती केली तरी फारसा उपयोग होत नाही. शुध्द पोलादाची, म्हणजे लोखंडाच्या अणूंची आंतरिक उर्जा, लोखंडाच्या ऑक्साईडच्या रेणूंच्या आंतरिक उर्जेपेक्षा जास्त आहे. नैसर्गिक प्रक्रिया नेहमी जास्त उर्जेकडून कमी उर्जेकडे आपोआप जात असतात. त्यामुळे लोखंड गंजण्याची क्रिया नैसर्गिक आहे. कितीही प्रतिबंधात्मक उपाय योजिले तरी गंजण्याची क्रिया थाबविता येत नाही. ती फक्त लांबविता येते. लोखंडाचा गंज निर्माण होणे ही स्वाभाविक क्रिया आहे, ती आपोआप घडते. पण लोखंडाच्या गंजापासून शुध्द लोखंड, आपोआप कदापिही निर्माण होत नाही.

पुरातन इमारती बांधतांना लोखंडाचा वापर न करता, दगडांचा वापर केला आहे. सिमेंट म्हणून वापरलेल्या साहित्याचे रुपांतर, शुध्द कॅल़्शियम कार्बोनेट या खडकासारख्या पदार्थात झाल्यामुळे, सांधे चिरकाल टिकणारे झाले आहेत. आता बांधल्या जाणार्याु अुंच इमारती, पुरातन इमारती इतक्या टिकणार नाहीत असे दिसते.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..