नवीन लेखन...

भारतातील प्रवासी गाड्यांचे क्रमांक

प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात.

१०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.

उदाहरणार्थ, वन-डाऊन मुंबई-हावरा मेल व्हाया नागपूर; तर टू-अप हावरा मेल व्हाया नागपूर.

परंतु एखादी गाडी अपवादही असे. उदाहरणार्थ, हावरा स्टेशनकडून मुंबईकडे अलाहाबाद मार्गे येणारी गाडी ‘डाऊन’ म्हटली जाई व मुंबईकडून हावराला जाणारी गाडी ‘अप’ म्हणत. त्याकाळात हावरा स्टेशनवरून मुंबईकडे निघणारी ती पहिली गाडी होती.

जसजशी रेल्वेच्या गाड्यांची संख्या वाढत गेली व त्यानुसार रेल्वेचे विभाग, पोटविभाग बनत गेले, तसतशी गाड्यांना क्रमांक देण्याच्या पद्धतीत सतत सुधारणा करावी लागते आहे. तीन अंकी, मग चार आणि आता पाच अंकी क्रमांक देणं क्रमप्राप्त झालं आहे.

गाड्यांना दिला जाणारा क्रमांक खालील गोष्टी दर्शवितो:

पहिले १, २ हे क्रमांक दूर पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस किंवा नवीन आलेल्या गाड्यांना दिले जातात.

पहिल्या आकड्यावर ० असणं ही विशेष गाडीची ओळख समजली जाते.

पहिला अंक ५ अंक असेल तर ती गाडी पॅसेंजर म्हणून ठरवितात.

गाडीला दिलेल्या क्रमांकातील दुसरं स्थान हे गाडीच्या झोनचं दर्शक असतं.

गाडीला दिलेल्या क्रमांकावरील शेवटची दोन स्थानं म्हणजे गाड्यांचे ओळीने लावलेले क्रमांक समजावे.

उदाहरणार्थ, कुर्ला-एर्नाकुलम (केरळ) दुरान्तो एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक १२२२३, एर्नाकुलम (केरळ)-कुर्ला दुरान्तो एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक १२२२४

हाच गाडी क्रमांक तिकिटावर येतो. प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले येताना प्रथम गाडीचा क्रमांक येतो. रेल्वे रिझर्वेशन फॉर्म भरताना गाडीचा योग्य तो क्रमांक लिहून द्यावा लागतो. रेल्वे टाईमटेबल बघताना गाडी क्रमांक माहिती असल्यास चटकन गाडीची वेळ, वगैरे सर्व शोधता येतं. आधुनिक जग अंकांचं (डिजिटल) आहे, तेव्हा अंकांशी जुळवून घेणं आवश्यकच आहे. हे रेल्वेबाबतही अनुभवाला येत राहते.

आपल्या जगण्यात रेल्वेचं असणं’ हे अत्यंत सुखदायी आहे, म्हणूनच तर रेल्वे अंतर्बाह्य समजून घेणं ही उत्सुकतेची, आनंदाची बाब ठरते; पण राजेशाही रेल्वे खऱ्या अर्थानं अनुभवायची असेल तर मात्र ज्या रेल्वेतून देश विदेशात मनसोक्त प्रवास करणं अनिवार्य आहे अशा गाड्यांपैकी आपल्याकडची एक रेल्वे आहे – ‘पॅलेस ऑन व्हील्स.’

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..