रवींद्र गुर्जर यांचा जन्म २९ एप्रिल १९४६ रोजी नगर येथे झाला.
रवींद्र गुर्जर हे अत्यंत लोकप्रिय अनुवादक म्हणून ओळखले जातात. तब्बल ४५ वर्षं ते साहित्य क्षेत्राशी निगडित आहेत. ‘पॅपिलॉन’ या पहिल्याच अनुवादित पुस्तकामुळे अफाट प्रसिद्धी मिळालेल्या गुर्जरांची आजपावेतो ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी केलेले सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, इस्राइलची गरुडझेप, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, दी पेलिकन ब्रीफ, फर्स्ट टू डाय, सुवर्णयोगी यांसारखे एकाहून एक सरस अनुवाद तुफान लोकप्रिय ठरले आहेत.
त्यांनी ‘पर्यटन,’ ‘आपले स्वास्थ्य,’ ‘संतकृपा,’ ‘धर्मश्री’ यांसारख्या मासिकांचं आणि काही पुस्तकांचं संपादन केलं आहे. तसंच स्वतःची ‘गायत्री’ नावाची प्रकाशनसंस्था काढून शंभरावर पुस्तकंही प्रकाशित केली आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रेखा ढोले फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मानचिन्ह आणि २५ हजार रुपये असा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसंच कोल्हापूरच्या विमेन्स फाऊंडेशनतर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply