तृप्ती व समाधानात धुसर रेषा
समाधानात तृप्ती का
तृप्तीत समाधान !
तृप्ती व समाधान
जीवनाच्या गाडीची दोन चाके
एक चालते
दुसरे डुगडुगते !
समाधानाच्या वाटेवर अतृप्तीचे काटे
तृप्तीच्या युक्तीने एकही न रुते !
तोच खरा मार्ग
समाधानाने तृप होतो
तृप्तता मिळूनही
समाधान होत नाही
त्याचा मार्ग चुकतो !
समाधानाच्या पाठी धावताना
तृप्ती दिसेनाशी होते
समाधानातून तृप्ती मिळविता येते
तृप्तीचे समाधान वेगळे असते !
अतृप्तता समाधानाचा अभाव आहे
तो तर
समाधान आणि तृप्तीचा लपंडाव आहे !
कायमच अश्या गोष्टींचा गोंधळ होतो
समाधन समोर असूनही तृप्तता मिळत नाही
तृप्तता मिळूनही समाधान होत नाही !
खरे काय खोटे काय
सर्व मनाचे खेळ आहेत !