गुलमुसलेली सांज केशरी…
गतआठवांचे थवे नभाळी…
भावनांचे अंतरंग लाघवी…
शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी…
स्वरगंगेत नाहता भावप्रिती…
गोधुलीची ही सांज आगळी..
मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी…
प्रीतभारली तू कोमलकळी…
सत्यप्रीती , हे दान भाळीचे…
मकरंद , अमृती हा मधाळी…
तृप्तीचे आभाळ अलौकिक…
घुमते पावरी हरिची नभाळी..
सांजाळलेल्या केशरी उदरी..
उमलणारी प्रभात सोनसळी..
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. 61 / ६ – ५ – २०२१
( मुक्तरचना)

Leave a Reply