तू असा, तू कसा,
कोसळता धबधबा जसा,
अखंड जलप्रवाहाची जादू,
ओघ खळाळता जसा,—!!!
तू असा, तू कसा,
वावटळीचे वादळ जसा,
दाही दिशांना कवेत घेऊ,
पाहणारे थैमान’च जसा,
तू असा, तू कसा,
भडकता ज्वालामुखी संतापाचा डोंह उसळता,
आगीचा डोंब जसा,–!!!
तू असा, तू कसा,
दरीइतका खोल जसा,
आंत आंत डोकावता,
गहिरा गहिरा गूढ जसा,
तू असा, तू कसा,
उंच पहाडासारखा,
टक्कर कितीही देता,
“निश्चल, अचल” असा,
तू असा, तू कसा,
“गडगडाटी” मेघासारखा,
गर्जना करत करत,
वावरणारा “जलद” कसा,
तू असा तू कसा,
कोसळणारा पाऊस जसा,
अमृत-संजीवनी देऊन,
भिजवून टाकणारा जसा,
तू असा, तू कसा ,
अथांग समुद्रासारखा,
कधी भरती, कधी ओहोटी,
कधी शांत प्रशांत जसा,
तू असा, तू कसा,
लहानबाळासमरडणारा, मित्रासारखा पण अवखळ,
भित्रट बालक जसा,
तू असा, तू कसा,
कसदार नट जसा ,
भीतीच्या बहाण्याने,
जवळ येणारा प्रिय जसा,
तू असा, तू कसा,
निष्पाप निरागस बाळ जसा,
बिनसले कितीही तरी,
गळाभेटीने सर्वस्व जसा,—!!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply