तू असा, तू तसा,
तू कायसा, कायसा,
अनंत रुपे भगवंता,
घेतोस कशी रात्रंदिवसा,–!!!
कधी वाऱ्याचा स्त्रोत तू,
कधी, खळखळणारे पाणी,
कधी खोल खोल दरी तू,
कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!!
शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी,
झऱ्याजवळ का धबधब्यात,
सोनेरी उन्हात राहशी,
का डोंगरातील कपारीत,–!!!
बाळाच्या हास्यात दडशी,
का अंधारल्या गुहेत,
प्राण्यांच्या दिमाखी बघावे,
का पक्ष्यांतील सौंदर्यात,–!!
जगातील आश्चर्यात पहावे,
की, माणुसकीच्या ओघात,
देवघरात असशी का तू,
का सज्जनाच्या हृदयांत,–!!!
फुलांतील सौंदर्य, गंध तू,
की फळातील मधुरपण,
माणसातील विवेक तू का, त्याच्यातीलच *सूज्ञपण*,
कुठे कुठे पाहू तुला,
न पाहताच भासशी तू,
आहेस अंतरातील खूण,
नि काळजांतील धून,–!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply