छान वाटले
भेटता तू एक
दूर जाऊ नको
वेगळी तू एक……… !
भेट तुझी होणे
गोष्ट साधी नाही
भावले मना असे
कुणी आधी नाही……….!
भावना छान ही
आवडते कुणी
मनात घर एक
करे नवे कुणी………..!
अंतर आहेच
खूप गोष्टींचे
नात्यात नको
यामुळे अंतर…………!
कल्पनेतले हे
सुंदर जग न्यारे
मनास लागू नये
वास्तवाचे वारे………..!
कवितेने दिली
भेट अचानक
कविता सुरेख
आहे तूच एक………..!
— अरुण वि. देशपांडे – पुणे
9850177342
(साभार – काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे -ई-मासिक – काव्यानंद -अंक-मार्च -२०१९ )