तू मला कधी भेटणार…
निर्विकार तुझ्या चेहऱ्यावर
विकार कधी दिसणार…
सुंदर पण कोमेजलेल्या तुझ्या
चेहर्यावर हस्य कधी फुलणार ….
कठोर आवाजात तुझ्या
गोडवा कधी येणार…
गुलाबी गालावर तुझ्या
पुन्हा खळी कधी हसणार…
पुर्वीचे ते चैतन्य
तुझ्या वागण्यात कधी जागणार…
माझ्या आठवणीतील ती
तू मला कधी भेटणार…
© कवी – निलेश बामणे
Leave a Reply