तू नावाचे तूफाsssन ,
मी कसे पेलावे,—
वाऱ्याचा अखंड स्त्रोत,
सुसाटपणात वाहून जावे,—
नुसता वारा कसला वादळच,
त्यात भरकटत जावे,-?
होत्याचे नव्हते करत,
कितीदा तुला मी पेलावे,
तू तर कोसळती उल्का,
पतन किती जोरात तुझे,
ओंजळ माझी चिमुकली,
सांग कसे हाती धरावे,—!!!
विलक्षण स्वैर प्रभावाने ,
जिथे तिथे वागशी, –!!!
तुझ्या चमकत्या हुशारीने,
बरेच जण पडती फशी,
बेधडक”” व्यक्तिमत्त्व असे,
दिसते तुला खुलुनी,
तुझ्या प्रेमळ सामंजस्याने,
दुनिया सगळी जाई दिपूनी ,–!!!
*कधी असा कधी तसा *,
केव्हा मोठा, लहानही,
सांभाळावे कसे सांग,
चक्क” लहान बाळ कधीही,–!!!
या परिपक्व बाल्यास ,
किती “परोपरीने” समजवावे,
होता तुझ्या भावनांचा उद्रेक, गडगडाटी ढगाला कसे आवरावे, हट्ट तुझ्यातील मुलांचे,
सारखे किती पुरवावे,
बसणे तुझे असे फुरंगटून*,
किती वेळा समजून घ्यावे,–
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply