तूं सुखकारी, तूं विघ्नारी, तूं नियतीचा अधिपती
हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं ।।
जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां
पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां
तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती ।।
जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती
फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती
वाजे डंका, अन् आशंका मनिं कांहीं नच उरती ।।
मी हतभागी, अंधार जगीं, पुढला ना मार्ग दिसे
वाटेवरती काटे रुतती, दुर्भाग्यभुजंग डंसे
देइ अनंता धरुन हात आनंदमयी मुक्ती ।।
– –
– सुभाष स. नाईक
Leave a Reply