तूच माझी राधिका,
तूच माझी प्रेमिका,
मोहिनी माझी तू ,
तूच माझी सारिका, –!!!
मुसमुसते प्रेम तू ,
सौंदर्य ओसंडून वाहे,
मदनाची रती तू ,
भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,–!!!
कमनीय सिंहकटी तुझी,
बाहूत माझ्या सामावे,
लाल कोवळे ओष्ठद्वज,
डाळिंबीची जणू फुले,–!!!
मोहक बांधा तुझा,
जाता-येता खुणावे ,
कुंतलाचे मानेवर ओझे,
पाठीवरचा तीळ झाके, –!!!
आरस्पानी रंग-गोरा,
काळजां घायाळ करतो,
गोड गुलाबी कायेवर,
लज्जेचा गेंदा फुलतो,–!!!
मिटून घेशी शृंगारात,
संकोची तू कासवी,
मदनाची बाधा होता,
फुलून येते रातराणी,–!!!
*ऐहिक तू भोगिनी,
मजसाठी मात्र योगिनी,
भोग–योगाच्या संयोगी,
अलौकिक तू कामिनी*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply