तूच तार सहज झेडली रे
अन अलवार मी उलगडले,
तुझ्या स्वप्न मिठीत आता रे
मी पुरती तुझ्यात गंधाळले..
सहज विसरायचं म्हणलं
तरी अधिक आठवण येते,
अन त्या वेल्हाळ स्वप्न मिठीत
मी पुरती बैचेन अर्ध्या रात्री होते..
सहज विसरायचं सारं मग
निर्जीव मी बाहुली नाही रे,
मन न ताब्यात राहतं कधी रे
परी वेदनेचे घाव नको आता रे..
भूल पडली तुझी अचानक
नकळत तुझ्यात मी गुंतले,
दोष असेल लाख कसला तो
न चालते इथे कुणाचे काही रे..
चांदण्याचा सडा निल अंबरी
त्यात तुझा मोह अधिक होतो,
व्यक्त झाले मनस्वी मी कधीच
वेदनेचा सल उरात आता मिटतो..
अल्लड बावरी झाले मी रे
वळणावर वाट वाकडी होता रे,
का गुंतले तुझ्यात हलकेच रे
मोह मनाचा दोष अंतरी मला रे..
भावनेच्या ओल्या बहरात
एक गुलाब फुलला रे,
स्पर्श तुझा असेल मोहक
धुंद जीव त्यात मोहरला रे..
तुटतो तारा अलगद असा
डोळ्यांत सर अश्रूंची जमते,
न कळतात वेदना मग गुलाबाच्या
नशिबात गुलाबाच्या काटेच अधिक रे..
अल्पजीवी असतो गुलाब
कोमेजून जातो तो लगेच रे,
गुलाब हाती धरता मज मिळाले
तुझ्या आर्त आठवणींचे काटे रे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply