१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )
बडे दिलवाल्या साहीरने ही विनवणी केली. त्याच्या लेखणी इतकेच त्याचे दिल बडे असावे कदाचित ! ( शेवटी अमृता प्रीतम सारख्या वाघिणी बरोबर दोस्ती निभवायची म्हणजे खेळ नाही ).
पण कोविड ग्रस्तांनो रोज तुमच्या कहाण्या ऐकणारा /पाहणारा/ संवेदनांनी जाणून घेण्याचा अपुरा प्रयत्न करणारा मी कसं म्हणू – ” तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानी मुझे दे दो ? ”
ना एवढी ओंजळ माझी ना एवढा विशाल मायेचा पदर ! हात बांधून घरात बसलोय -सुरक्षित ! शक्य त्या सर्वांसाठी प्रार्थना करीत – अधून मधून खुशाली विचारण्यासाठी फोनही करतोय आणि स्वतःलाच तसल्ली देतोय.
अम्मा (माता अमृतानंदमयी ) यांनी सांगितलंय – ” या दिवसात LOGIC आणि INTELLECT बाजूला ठेवा आणि श्रद्धा (FAITH) व प्रार्थनेचा (PRAYER) हात धरा.”
म्हणूनच माझा वर्गमित्र बलभीम संकपाळचे परवा कोरोनाने मुंबईत दुःखद निधन झाले तरी मी अम्मांच्या भरवशावर आहे.
कोणाकोणाचे रंज , गम , परेशानी मागू ? सोपं नसतं असलं वचन पाळणं !
खूप पूर्वी ” अगर मुझसे मोहोब्बत हैं , मुझे सब अपने गम दे दो ” हे एकीला दिलेलं वचन पाळताना माझी आजही त्रेधा उडतेय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply