तुमच्या हृदयीचा राजा,
गुलाब असे ना जरी,
माझ्यासारखा राजबिंडा,
मिळेल का तुम्हालाही,–?
जन्म घेतला राजवंशा,
नसते कुणी राजा म्हणुनी,
कर्तृत्वाने मोठे व्हाया,–
पाकळी पाकळी अगदी फुलुनी–!!
विचारा थेट आपल्या हृदयां,
फूल माझे छोटे अगदी,
बघा मोठ्या कार्यकर्तृत्वा,–
मी मागे नाही जराही,–!!!
रंगीबेरंगी जराही नसता,
दुनिया आकर्षित होई,
डोलारा खूप नसता मोठा,
भरल्या आंत राशी सुगंधी,–!!!
वाऱ्याबरोबर घमघमाटा,
येईल नक्की कानी स्तुती,
काम, मद, मोह वाढे तुमचा,
इवल्या फुलांचीच देणगी,–!!!
हिरव्या पानांचा आधार मिळतां सारी सुंदरच रंग -संगती,
आमच्या फुलांचा गजरा,
बघून लेकीसुना भाळती,–!!!
सोडा क्षणभर त्यांना,—
ओढले जाती पुरुषही किती,
सगळे विश्वच मागे आमुच्या,
कोणां आम्ही आवडत नाही,–?!!
पानांच्या चिमुकल्या दुलया,
त्यात जागोजागी कळी ,
फुलतां, उमलता बहरता,
अल्लद अगदी लपलेली,–!!!
शुभ्र धवल नाजूक कळ्या,
हळूच आपले डोके काढती, स्वर्गीच्या शापित अप्सरा,
का म्हणू कोमलांगी पऱ्या,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply