नवीन लेखन...

तुम्ही महिला आहात म्हणून…

मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत….

माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी … जे मला स्त्रियानाच विचारावेसे वाटतात .

गळ्यात मंगळसूत्र घातल्याने म्हणजे तुमचा पती जिवंत आहे नाहीतर नाही ह्याचा अर्थ असा होतो काय ??

तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ….स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही ….

लग्नातच तुम्हाला जोडवे घातल्या जाते . भांगात कुंकू भरल्या जाते कधी लहानपणापासून न घातलेल्या बांगड्याचा भार सहन करावा लागतो . नवरा जिवंत असताना एखादी दिवस साधी कपाळावर टिकली जरी नाही लावली तरी हा समाज मागे कुरबुर करतो . सासू दातओठ खाते आपल्याच नावाने . आणि नवरा मरतो तेव्हा स्मशानातं त्याचा मृत्यू देह नेत नाही तर हाच समाज लग्नात जे संस्कृती म्हणा रितीरिवाजाच्या नावाखाली म्हणा जे काही बहाल करतो ते सारं काढून घेतल्या जाते . कपाळावरच कुंकू पुसल्या जातं हातातल्या बांगड्या काढून घेतल्या जाते एवढंच काय तर नवरा मेल्यावर हिरव्या बांगड्याचा चुडा ही त्या स्त्रीने कधी घालू नये . म्हणजे स्त्रीच्या सौन्दर्याची सारीच शान लयाला गेली . लावलीच कधी कपाळावर टिकली तर मग समाजच ओरडेल ..म्हणेल ,” ह्या स्त्रीचा नवरा मेलाय आणि बघा हिला नाटण्या सावरण्याची आवड गेली नाही …”

मग ह्या अश्या बंधनात तुमचं स्त्रीपण तुम्ही का विकावं ?

टिकली नाही लावली तरी नवरा तो नवरा असणारच आहे ..लावली तरी असणारच आहे राहाला प्रश्न तुमच्या सौन्दर्याचा नाही सौभाग्याचा प्रेम करता ना नवऱ्यावर तर तुमचं खरं सौभाग्य तोच आहे ..लग्न झाल्यावर पुरुर्षांचं कधी आडनाव बदल्या जाते का ? नाही ना ! तुम्ही का म्हणून आपलं वडिलांकडील आडनाव आहे ती ओळख मिटवून नवऱ्याचं आडनावं लावावं ?

आज काल फॅड आलंय राव …मुलांनाही कानात डूल कुरळ्या बारीक केसाची चुटी घालताना बघितलं . लेडीज ब्युटीपार्लर सारखे जेन्टस ब्युटीपार्लर वर जाऊन पुरुष मेकअप करू लागलेत ..मग त्यानेही बांगड्या घातल्या हातात तर बिघडलंय कुठे ??

स्त्रियांनो घालतात का पुरुष हातात बांगड्या ? नाही ना ! तुम्हाला लग्न झाल्यावर बांगड्या हातात नसलं म्हणजे स्त्री रूपच संपल्या सारखं वाटतं ..काहीच नका घालू हातात एक वेळ सांगणारी आणि वेळेवर सावध करणारी घडी बांधली तरी पुरे आहे .

मी स्वतः स्त्रीच्या हक्काचा , तिच्या स्वाभिमानाचा विचार करून तिची कुटुंबात , सामाजात , राष्ट्रात , देशात उन्नती व्हावी म्हणून सतत वाटचाल करत असते ..पण , जेव्हा ह्याच देशातील सुशिक्षित स्त्रीला बघते जी स्वतः चा आणि फक्त स्वतःचा विचार करते . ती खूप कमवत जरी असली तरी येणाऱ्या पगारात हा विचार करते मी कंठाहार बनवू की मोत्याचा नेकलेस घेऊ ?? नाही तर जरीची नवीन साडी आली आहे म्हणते मार्केट मध्ये ती घेऊ , म्हणजे पार्टीत लग्नात मी सर्वं स्त्रियांमध्ये उठून दिसली पाहिज ना ! हे विचार साहजिकच आहे प्रत्येक स्त्री च्या मनात रेंगाळत असते . शान शौकत आणि पैसा मानवाला तात्काळ क्षणांसाठी सुख देत असला तरी मेल्यावर तो तुमचं अस्तित्व इथे चिरकाल ठेवत नाही …त्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं संघर्ष करावा लागतो स्त्रीच्या हक्कासाठी . आपल्या जवळ सर्व आहे ना ! इट्स ओके ज्यांचा जवळ नाही त्यांच्या हिताचा विचार करू … जेव्हा एखाद्या युवतीवर किंवा स्त्रीवर बलात्कार होतो तो त्या एकट्या स्त्रीवर न होता संपूर्ण स्त्री जातीवर होतो …मग समाजातल्या सुशिक्षित स्त्रीने अशिक्षित स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढणं हे तिचं कर्तव्यच आहे …बलात्कार आमच्यावर नाही झाला जिच्यावर झाला ती पोलिसाना तोंड देत बसेल ती न्यायालयाची पायरी चढेल …आम्ही मात्र दिवसेंदिवस वाढतं जाणाऱ्या बलात्काराच्या घटना वर्तमानपत्रात वाचून घरबसल्या खंत व्यक्त करू …पण एखादी स्त्री संघटना काढून बलात्कारासारख्या विषयावर कायमचा स्टॉप करू हा विचार नाही करणार …. तुम्ही म्हणान बलात्कार हा विषय स्त्री संघटना काढून संपणारा नाही आहे .. ते खरं असलं तरी समाजात वावरणाऱ्या हिंसक नराधमाला आपण एकत्र येऊन नक्कीच आळा घालू शकतो …कुठं वर सहन करणार ? शेवटी स्त्री म्हणजे स्त्री असते ती कुण्या नवऱ्याची बायको असण्याआधी एक जिता जागता मानव आहे .निसर्ग बदल स्वीकारतो पण माणूस नाही ..

– कोमल प्रकाश मानकर
9011071641 

Avatar
About कोमल सुनंदा प्रकाश मानकर 6 Articles
स्त्रीविषयक लेखन ललित कविता #metoo सदर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..