अत्याधुनिक घरे कशी असतात? सर्व सुख-सुविधांनी युक्त, आकर्षक, नीटनेटकी नि प्रसन्न. अशा घरात आपणही राहावे, असे वाटते ना? मात्र, अशा घरासाठी इंटिरिअर डिझायनर मदत घ्यावी लागेल. ती घ्यायची नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला जरूर मदत करील.
इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करणाऱ्या कांचन बापट यांनी या पुस्तकात त्यासंबंधात इथ्यंभूत माहिती दिली आहे. प्रारंभी त्या आपली जीवनशैली आणि घराचे इंटिरिअर यांची सांगड घालतात. घराचा प्लान करण्यापूर्वी काय करावे, बजेट आणि एस्टीमेट याचा आढावा घेऊन नंतर प्रत्यक्ष इंटिरिअर करताना लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, मुलांची खोली, ज्येष्ठांची खोली, गेस्टरूम अशा बाजूंनी त्या इंटिरिअरचा विचार करतात. वास्तुशास्त्र, फेंगशुई याबरोबरच फार्महाऊसची सजावट याबद्दलही माहिती मिळते.
Author: कांचन बापट
Category: कलाकौशल्य
Publication: मेनका प्रकाशन
Pages: 126
Weight: 150 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380572895
Leave a Reply