तुटल्या तारा त्या
झंकारत नाही,
अबोल चांदण्यात
चंद्र उजळत नाही
कोरड्या शब्दांत भाव
उमटत नाही,
वेदनेतल्या जाणिवांचे
कढ दिसतं नाही
मिटल्या फुलांचा वास
उरतं नाही,
तोडल्या मनात सुख
उरत नाही
झोका स्वप्नातला एक
झुलवून गेला,
रिक्त मनात आल्हाद
जीव पोळला
खेळ झाला असा
भावना विरल्या,
निर्जीव भावली सम
खेळ रंगला
मन कोमेजले अधर
नव्हती कल्पना,
कोण कोणास बोलता
हृदयात कंपना
सल बोचरी उरली
उरल्या वेदना,
न कोणाचे कोणी
नकळे संवेदना
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply