तुझे शब्द माझ्या पर्यंत कधी पोहचले आहेत?
नेहमीच या दुनियेने ओढले आहे
जबरदस्तीने परंपरेच्या पाकात
अन तुझे शब्द घसरून
परत माघारी फिरले आहेत,
तुझे शब्द माझ्या पर्यंत कधी पोहचले आहेत?
तुझ्या ओठात चक्राकार होत
माझ्या काना पर्यंत
तुझ्या शब्दांचा प्रवास
एका युगा समान आहे,
पुस्तकात वाचले होते
प्रकाशाचा वेग
ध्वनी पेक्षा गतिमान असतो
कदाचित त्यामुळेच
तुझ्या डोळ्यातून
व्यक्त होणारे शब्द
माझ्या पापणीच्या टोकाला
मुक्काम करतात,
तुझे शब्द माझ्या पर्यंत कधी पोहचले आहेत?
*****
मुळ हिंदी कविता-
तुम्हारे शब्द मुझ तक पहुँच ही कहां पाते हैं ?
कवि –
अनूप भार्गव, अमेरिका
अनुवादक- विजय नगरकर
vpnagarkar@gmail.com
Leave a Reply