तुझ्याशिवाय,
दिन भासे राती सारखा,
रात्र उजाडता भकास पसरे,
दिन उन्हासारखा,–!!!
तुझ्याशिवाय,
पावसाळा अगदी कोरडा,
वर्षाव संजीवनाचा भले,
होत राही सारखा,–!!!
तुझ्याशिवाय,
हेमंत ऋतू येता,
उदासपण भरलेले,
जीवन अव्याहत चालता,–!!!
तुझ्याशिवाय,
आगमन होते शिशिराचे,
मन पालवी गारठून जाते,
दूर — दूर तू राहता, -!!!
तुझ्याशिवाय,
ग्रीष्म ही भासे रुक्ष पहा,
अधिक अधिक करत राहे,
काहिली जिवाची माझ्या,–!!!
तुझ्याशिवाय,
ऋतू सगळे निष्काम बनतां,
आससून मी वाट पाहते,
माझ्यात मीच नसतां,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply