नवीन लेखन...

त्वचा रोग तज्ञ डॉ. पल्लवी उत्तेकर – तेलवणे

‘का भुललासी बाहेरी रंगा’ वरलिया असा प्रश्न आपल्या संतानी केला आहे, तरी सुद्धा ‘ पी हळद आणि हो गोरी’ असा उपदेश मुलीना जुन्या काळात दिला जात होता. आजच्या काळात मुली आणि मुले भेद न करता आपली कांती गोरी व्हावी म्हणून सर्वच तरूण मंडळी कुठल्यातरी क्रीमचा वापर करीत असतात. या संबधित अनेक जाहिराती आपण दूरदर्शनवर सतत बघत असतो. माणसाच्या कातडीचा रंग हे केवळ सौंदर्याचे लक्षण राहिलेले नाही तर त्याचे समाजातील स्थान ठरवीत असते असा वर्षानुवर्षे चालत आलेला हा समज आजही आपल्या मनात ठाण मांडून आहे

सौंदर्यशास्त्रात ज्याला कांती म्हणून संबोधिले जाते त्यास शरीर शास्त्रात कातडी अथवा त्वचा म्हंटले जाते. मानवी शरीरातील कातडी हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. त्यामुळेच ते सर्वात जास्त दुसऱ्याच्या डोळ्यात भरते. या कातडीत अथवा त्वचेत जर दोष अथवा रोग निर्माण होऊन तिचे जर रंग रूप बदले तर त्या व्यक्तीचे जगणे काही वेळा कठीण होऊन जाते. शारिरीक दोषापेक्षा मानसिक आघात त्या व्यक्तीला खच्ची करून जाते . अशा वेळीस त्यास गरज असते ती मानवी संवेदनशीलतेची आणि सर्जनशिलतेची. अशी एक ठाण्यातील वैद्यकीय त्वचा तज्ञ आहे डॉ. पल्लवी उत्तेकर तेलवणे. ठाणे सहकारी बँकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सतीश उत्तेकर यांची पल्लवी ही सुकन्या.

आठवीची परीक्षा झाल्यावर जिज्ञासाच्या हिमालयन शिबिरात सहभागी झालेली पल्लवी उत्तेकर, शिबीर झाल्यावर जिज्ञासाच्या विविध उपक्रमात सहभागी होऊ लागली. इथे तिचे संवेदनशील व्यक्तीमत्व फुलु लागले. शिवसमर्थ शाळेतील वातावरणपण यास पोषक होते. शाळेतील तिच्या मैत्रिणी ‘ रेणुका ओझरकर , अनघा दातार , जुईली बर्वे या सर्व तिच्या बरोबर जिज्ञासाच्या शालेय जिज्ञासा या नियतकालिकात उत्साहाने सहभागी होत्या. सहाजिकच राष्टीय बाल विज्ञान परिषदेमध्ये या चौघींनी एकत्र गट करून विज्ञान प्रकल्प करण्याचे ठरविले. १९९७ साली राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा प्रमुख विषय होता ” माझ्या स्वप्नातील भारत आपल्या प्रकल्पात त्यांनी मतीमंदत्व म्हणजे काय ?, त्याची कारणे, प्रकार, उपचार यांची शत्रोक्त माहिती दिली होती. त्याबरोबर काही रुग्णाच्या केस स्टडीज चा अभ्यास केला होता. यासाठी बाल वैज्ञानिकांनी त्या रुग्णांचा बुध्यांक आणि भावनात्मक गुणांक काढला होता. पालकांच्या मुलाखतीतून रुग्णाच्या वागणूक आणि क्रिया यांची माहिती मिळवली होती. या सर्व प्रकल्प करताना त्यांना विश्वास संस्थेच्या सौ. अश्विनी सुळे आणि अरविंद सुळे आणि अमेय पालक संस्थेचे श्री. अविनाश बर्वे आणि सौ. नंदिनी बर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले होते. १९९७ साली भोपाळ इथे झालेल्या राष्टीय बाल विज्ञान परिषदेत सादर करण्यासाठी पल्लवीची महाराष्ट्रातून निवड झाली होती.

शालान्त आणि उच्च शालान्त परीक्षेत लक्षणीय यश मिळवून पल्लवीने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. वैदकीय पदवी संपादन करून तिने घाटकोपर यथील राजावाडी हॉस्पिटल मधून ‘त्वचा रोग’ हा अभ्यासक्रम निवडला. त्या विषयात तिने डी.एनबी ही पदवी मिळवली. याच विषयात पुढील उच्च अभ्यासक्रमात तिने बालकांमधील विविध त्वचा रोगाचे प्रमाण या विषयावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला होता. हा प्रबंध तिने रुग्णालयात उपचाराला आलेल्या १४०० बालक रुग्णाचा अभ्यास करून लिहिला होता. ‘आपल्या सारख्या अप्रगत देशात अस्वच्छता आणि आरोग्यास घातक असलेल्या परिस्थितीमुळे संसर्गजन्य त्वचा रोगाचा बाल्कांच्यात प्रसार जास्त होतो’ हा तिच्या संशोधनाचा निष्कर्ष होता. हा निष्कर्ष पाश्चिमात्य अभ्यासापेक्षा वेगळा होता. प्रगत देशात अति स्वच्छतेमुळे मुलाच्यातील जंतू विरोधी प्रतिकार शक्ती कमी पडते. त्याच बरोबर आपल्याकडे सुद्धा उच्च वस्तीतील मुलांच्यात ही लक्षणे दिसून येत आहेत ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे.

सार्वजनिक रुग्णालयात नियमितपणे काम करताना त्वचेवर उठणाऱ्या पांढरे चट्टे असलेले रुग्ण जास्त संख्येने तपासणीसाठी भेटू लागले. सर्वसाधारण भाषेत ज्याला कोड उठले असे म्हणतात त्याचा हा प्रकार होता. वैद्यकीय भाषेत याला व्हिटीलगो म्हणतात. हा खरा म्हणजे रोग नाहीच आहे. आपल्या कातडीच्या वरच्या स्तरावरील त्वचेतील रंग देणाऱ्या पेशींची कमतरता अथवा नष्ट होणे या मुळे त्वचेवर पांढरे चट्टे दिसू लागतात. या मध्ये नॉन सेगमेटल आणि सेगमेंटल असे दोन प्रकार आहेत. हे होण्यामागची कारणे अजूनही अस्पष्ट आहेत. हे दोन्हीही प्रकार अनुवांशिक नाही आहेत. परंतु त्वचा विद्रूप होत असल्याने या वैगुण्या बद्दलसमाजात गैरसमज खूप आहेत. पूर्वीच्या काळात आणि आज सुद्धा काही प्रमाणात या रुग्णांना कुष्टरोगी समजून त्यांची अवेहेलना केली जाते.

लेखाच्या सुरवातीस ज्या मानसिक धक्याचा उल्लेख केला आहे तो या पिडीत रुग्णाच्या बाबतीत जास्त लागू पडतो.अंगावर चट्टे उठलेला रुग्ण सुरवातीस ते लपविण्याच्या प्रयत्न करीत असतो. जगासमोर अशा परीस्थितीत येण्याची त्याची मानसिकता नसते. इथे डॉक्टरांची संवेदनशीलता कामास येते. आज यावर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. हे वैगुण्य पूर्णपणे बरे होऊ शकते. पल्लवी याच कार्यात जास्त मग्न आहे.

त्वचेवरील शस्त्रक्रिया हि पूर्वी सर्वसाधारण शस्त्रक्रिया मध्येच गणली जात असे. आत्ता मात्र ती एक वेगळी शस्त्रक्रिया म्हणून समजली जाते. आधुनिक पीपीटी उपचारात रुग्णाच्या अंगातील रक्तातील प्लाटेट प्लाझ्माचा उपयोग करण्याची पद्धत वापरली जाते. यामुळे रुग्णाच्या रक्ताचा उपयोग करून स्टेम सेलची संख्या वाढवून रुग्णाची कातडीला संजीवनी देता येते. या पद्धतीचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी पण करतात. या उपचाराबरोबर लेसर थेरपी हा सुद्धा एक आधुनिक उपचार रुग्णांना उपलब्ध आहे. ही पद्धत जास्त एकाग्र असल्याने प्रभावी आणि जलद उपचार करणारी आहे.

पल्लवी सध्या ज्युपिटर रुग्णालयात आधुनिक उपचाराचा वापर करत आहे. राजीव गांधी रुग्णालयात गरीब रुग्णांना नवीन नवीन शोध लागत असलेल्या औषधांचा वापर करून दररोज शेकडो रुग्णांवर उपचार करण्याची तिला संधी मिळते. याच महाविद्यालयात ती लेक्चरर आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी ती समर्थपणे पार पाडीत असतानाच तीला नवीन औषधांवर संशोधन पण करता येते. या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडीत असतना तिने ठाण्यातील घंटाळी परिसरात स्वत:चे आधुनिक क्लिनिक ‘ माय स्किन’ पण सुरु केले आहे. पल्लवीला तिच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

सुरेंद्र दिघे
surendradighe@gmail.com

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..