नवीन लेखन...

दोन महान व्यक्तिमत्वं – दोघेही बॅरिस्टर – सावरकर आणि आंबेडकर

सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकारी सौ मंजिरी मराठे यांचा हा इंटरनेटवरील लेख आपल्या वाचकांसाठी खास शेअर करत आहोत…. सध्या जे राजकीय वातावरण कलुषित झाले आहे त्याला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हा लेख अत्यंत मोलाचा ठरेल…


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकाच दशकातील दोन महान व्यक्तिमत्वं. दोघेही बॅरिस्टर. दोघेही उत्तम वक्ते, प्रतिभावान लेखक. दोघांकडे नेतृत्वगुण होते, प्रभावी वक्तृत्व होतं.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्यता निर्मूलनाचं, जातीभेद निर्मूलनाचं अफाट कार्य केलं ते हिंदूंच्या एकीकरणासाठी, सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य हाती घेतलं ते बहिष्कृत समाजाच्या स्वातंत्र्यासाठी. समाजक्रांतिकारक सावरकरांनी वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, बेटी बंदी आणि रोटी बंदी या सप्त शृंखला तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दोघांचं उद्दिष्ट एकच होतं.

वीर सावरकरांनी रत्नागिरीत पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेशच नाही तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळवून दिला.

डॉ. आंबेडकरांनी नाशिक इथे काळाराम मंदिर प्रवेशाची घोषणा केली त्याला सावरकरांनी जाहीर पाठिंबा दिला. पत्रक काढून, सवर्णांनीच अस्पृश्यांचं स्वागत करून मंदिर सर्वांसाठी मोकळं करावं असं आवाहन केलं. सावरकरांच्या या पत्राचं आंबेडकरांच्या ‘समता’ पत्रानं स्वागत केलं होतं. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता. वृत्तपत्र, धनिकांचा पाठिंबा नसूनही आणि गांधींच्या मागे खूप मोठा जमसमुदाय असूनही आंबेडकरांना जे यश मिळालं त्यामुळे सावरकर आनंदित झाले. ‘आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचं संघटना चातुर्य, नेतृत्व करण्याचं सामर्थ्य या गुणांची जोड मिळाल्यामुळेच ते आज मोठे आधार म्हणून गणले जात आहेत’ अशा शब्दात सावरकरांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं.
1941 मध्ये लॉर्ड लिंलीथगोने कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करून त्यात सात भारतीय सदस्यांचा समावेश केला. पण त्यात दलित आणि शीख वर्गाचे प्रतिनिधी नव्हते. याचा आंबेडकरांनी निषेध केला. त्याला सावरकरांनी पाठिंबा दिला. ‘दलित वर्गाच्या प्रतिनिधीच्या जागेसाठी डॉ. आंबेडकरांसारखी दुसरी कार्यक्षम व्यक्ती सापडणार नाही, असं पत्र
सावरकरांनी महाराज्यपालांना पाठविलं होतं.

बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्धधर्मात प्रवेश केला ते सावरकरांना रुचलं नव्हतं. ‘सुधारकांच्या खांद्याला खांदा लावून लढलात तर दहा वर्षात तुमचे प्रश्न सुटतील. धर्म बदलून अस्पृश्यांचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न सुटणार नाहीत. तो समाज पुन्हा वेगळाच राहील’ असं सावरकरांचं सांगणं होतं. दुर्दैवानं तसंच घडलं आहे. अर्थात आंबेडकरांनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म न स्वीकारता हिंदू धर्माचीच शाखा असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे सावरकरांना थोडंसं समाधान वाटलं होतं. कारण सावरकरांच्या मते या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारे वैदिक, जैन, बौद्ध, लिंगायत सारे सारे हिंदूच.

देशहिताला सर्वोच्य प्राधान्य देणारे दोन महान नेते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
देशहितासाठी आज गरज आहे ती जात पात विसरून एकसंध समाज म्हणजेच फक्त आणि फक्त भारतीय म्हणून आपल्या देशासाठी उभं रहाण्याची. तीच असेल त्या दोघांना आदरांजली!!

— मंजिरी मराठे
Manjiri Marathe

(इंटरनेटवरुन)

3 Comments on दोन महान व्यक्तिमत्वं – दोघेही बॅरिस्टर – सावरकर आणि आंबेडकर

  1. अप्रतिम लेख
    आंबेडकर आणि सावरकर यांच्या समाईक विचारधारेवर मी “भिमविनायक विचार मंच” ची संकल्पना केली होती पण आतताईवादी लोकांना पटली नाही… त्यामुळे “विदासा विचार मंच “स्थापन करण्याचा मानस आहे

  2. Bouddha dhmma ha manavtavadi samtavadi dhamma ahe Hindu dharma vishamtavadi ahe Buddha dharmacha Hindu dharmacha nahi samandha nahi

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..