त्या दिवशी मला ती भेटली
म्हणण्यापेक्षा तिला पाहिले
पस्तीस वर्षाने…..
आम्ही एकमेकाकडे पाहिले
जरा जाड झाली होती
पण चांगली दिसत होती..
गळ्यात मंगळसूत्र दिसले नाही..
जरा चरकलो…
तिने पाहिले..
तिची नजर गोधळली..
मी जरा हसलो…
ती पण हसली..
कॉलेजचे नाव घेतले
ते सुद्धा मी..
दोन मिनिटे बोललो
म्हणाली आत्ता इथेच असते
मी पण म्हणालो इथेच..
बाकी काही विचारले नाही..
दोनचार जणाची नावे घेतली
परत भेटू म्हणून वेगळे झालो…
आत्ता मी नेहमीचा घराकडचा रस्ता
सोडून याच लांबच्या
रस्त्याने यायला
सुरवात केली आहे…..
— सतीश चाफेकर
खूपच सुंदर