त्या झऱ्यापाशी,
एकच झाड उभे होते,
निश्चल, निर्धास्त, अढळ,
वाऱ्यावर झुलत होते ,
वर्षे गेली दिन गेले,
रात्री आणि दिवस सरले,
अनेक बाके प्रसंग आले,
आले गेले नि परतले,
झाड मात्र तसेच राहिले,
झऱ्याकाठी लोक येती,
पाण्याने ताजेतवाने होती,
अनेक म्हातारे कोतारे ,
डोळ्यातून पाणी काढती,
त्यांच्या असती किती,
तारुण्यातील गोड स्मृती,
तिथेच येती तरुण-तरुणी,
हातात हात आपुले गुंफुनी,
विफल प्रेमाचे बसता चटके,
इथेच येऊन अश्रू ढाळती,
झाडाखाली तरुण जोडपी,
संसारातील गोष्टी करती,
वाद भांडणे प्रेम सारे,
झाडाला पहायला मिळती,
कुणी एकाकी जीव भटकती,
आपले दुःख प्रकट करती,
लहान मुलांगत सारखे रडती,
दु:ख वाटून झाड संन्यासी,
कुणी येई त्या डोंगरमाथी,
वैतागून जीवही देई ,
निष्काम ते कर्मयोगी,
झाड निमूट बघत राही,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply