जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।।
हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।।
दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।।
सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।।
आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।।
ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।।
‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।।
‘ देण्या ‘ मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले ।।४।।
सुधारुन घे आतां तरी । अनुभवाने चूक आपली ।।
उर्वरित वर्षे जाऊं दे । त्यागवृत्ती मध्यें सगळी ।।५।।
भोगातले सुख कसे ते । क्षणांत येई क्षणांत जाई ।।
त्यागातील समाधान परि । उशीरा लाभून सदैव राही ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply