त्याला ओळखता आले नाही
तिच्या मनातील नाजूक भाव,
मनातल्या गंधित फुलांचा मग
सुकून गेला कोरडा बाजार..
त्याला न कळला तिच्या
गोड मिठीचा व्याकुळ भाव,
त्याच्या स्पर्शातला उरला
मलमली धुंद सारा आभास..
त्याला न कळली अंतरी
ओढ अलगद मनातील तिच्या,
संस्कार बंधनात मग ती जरी
का न व्हावी मुक्त तिची भावना..
न कळले त्याला कधी
तिचा शांत स्थिर भाव,
न बोलून तोडता मनास त्याने
तुटल्या भावनांचा ओला भाव..
वेल्हाळ होतात भावना
न चालते कुणाचे कधी इथे,
अशीच राहील अबोल ती
परी काटे बोचरे मनास लागे..
कधी कळेल निःशब्द भाव
स्त्रीच्या व्यथा साऱ्या या,
न बोलता मिटते स्त्री अबोल
वेदना दुखावतात तेव्हा हजार..
खेळ झाला भावनांचा
परी त्याला ती कळली नाही,
ओढ अलवार त्याची अबोध
आठवण त्याची मिटली नाही..
मोहाचा गुंता आल्हाद सारा
मनास तिच्या मोहवून गेला,
न कळल्या भाव वेदना तिच्या
तो आठवणीत आता निशब्द राहिला..
वेगळ्या वाटा दुरस्थ या
का ओळख त्याची व्हावी,
दुःख तिलाच होई अवचित
न त्याला तमा तिच्या मनोवेदनेची..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply