आफ्रिकेच्या व्हिक्टोरिया सरोवरात सोडलेल्या ‘नाईल पर्च’ माशाने लहान ‘सिचलीड’ मासोळी खाण्याचा सपाटा लावला व मासोळी निर्वंश होण्याची वेळ आली. मग मोठ्या माशांची मासेमारी करणारे व्यापारी गब्बर झाले व सिचलीडसारख्या लहान माशांची मासेमारी करणाऱ्या गरीब कोळ्यांचे दिवाळे निघायला लागले. सध्याच्या आर्थिक मंदीच्या दिवसात कोळ्यांची आर्थिक क्षमता कमी कमी होत चालली आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना जल-सुरूंगासारखे संहारक उपाय शोधावे लागतात. खरं तर असले राक्षसी प्रकार मगरींचा वध करण्यासाठी वापरले जातात. उदरनिर्वाहासाठी त्यांना जल-सुरूंगासारखे संहारक उपाय शोधावे लागतात. खरं तर असले राक्षसी प्रकार मगरींचा वध करण्यासाठी वापरले जातात. सध्या व्हिक्टोरिया सरोवरात मासेमारी करणाऱ्या कोळ्याची संख्या प्रचंड म्हणजे ३५,००० च्या वर पोहोचली आहे. संयुक्तराष्ट्र तज्ज्ञांच्या एका अहवालाने सावध केले आहे, – ‘कोळ्यांचा बेछूट मत्स्य संहार थाबला नाही तर २०५० सालापर्यंत मत्स्यसंपत्ती संपणार!’ पर्यावरण र्हासाचे दुष्टचक्र लवकर थांबवता आले नाही तर भावी पिढ्याना जगण्याची आव्हाने स्वीकारतांना दिवसेंदिवस कठीण होणार. कविवर्य शैलेंद्र यानी माणसाच्या अस्तित्वाची अशाश्र्वता अगदी शेलक्या शब्दात मांडली, “गीत हमारे प्यारके.. दोहरेगी जवानिया.. मै न रहूंगी तुम न रहोगे.. फिर भी रहेगी निशानिया”
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply