उभ्या कपारी मधला प्राणी
सांडवत नाही कधी नाणी
आडवी कपार बसुनी मात्र
ग्रंथ पठण होते
खुल्या जमिनी वरती कोणी
डाव मांडत नाही
पेच सोडण्या साठी
डावपेच मांडला जातो….
अर्थ–
उभ्या कपारी मधला प्राणी, सांडवत नाही कधी नाणी
(संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.)
आडवी कपार बसुनी मात्र, ग्रंथ पठण होते
(पण जेव्हा तोच माणूस त्याच ध्येयं ठरवून त्याच आयुष्य जगण्यास सुरुवात करतो, त्यासाठी बाकी सारं त्याग करतो तेव्हा तो आयुष्य बनवताना इतरांचं आयुष्य घडवावे यासाठी बरच कार्य करून ठेवतो.)
खुल्या जमिनी वरती कोणी, डाव मांडत नाही
(आपलं वर्चस्व लक्षात घेऊनच माणसाने योग्य निर्णय घ्यावा, हातात काही नसताना मोठाल्या जबाबदाऱ्या घेऊन शेवटी पराभवच हाती येतो.)
पेच सोडण्यावसाठी, डावपेच मांडला जातो.
(संकट काळी योग्य ती तडजोड करून दोन पावलं मागे जाणं नेहमीच चांगलं असतं, पुढे यश मिळवण्याची संधी जरूर मिळते पण त्यासाठी बुद्धी आणि साहस दोन्हीचा वापर झाला पाहिजे.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply