उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे
कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे १
मंद मंद जळते शांत तुझे जीवन
धुंद मना करिते दूर कोपरीं राहून २
जळून जातेस तूं राख होऊनी सारी
तुझे आत्मसमरपण सर्वत्र सुगंध पसरी ३
तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी
आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं ४
लाडकी तूं भक्तांना तुजवीण पूजा नाहीं
प्रफूल्ल करुन चेतना प्रभू भाव मना येई ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply