नवीन लेखन...

उगाच काहीतरी – ११ (भारतीय शालेय वर्ष – एक (रिकामटेकडा) विचार)

ही पोस्ट खरं तर मागच्या वर्षी लिहिली होती पण गेलं वर्ष काय किंवा हे वर्ष काय. अगदी तंतोतंत फोटोकॉपी केल्यासारखे चालले आहेत.इतके की अगदी संपूर्ण शुद्धीत Deja vu चा अनुभव घेत असल्यासारखे. म्हणून म्हटलं यावर्षी इथे टाकू या. त्यात आता बऱ्याचशा परीक्षा रद्दच केल्या आहेत आणि महत्वाच्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आणि शाळा आता कधी सुरु होतील हा प्रश्नच आहे. याच संदर्भात आलेले विचार खाली मांडले आहेत.

भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते.

आता खरी वस्तस्थिती अशी आहे की भारतातील सगळ्यात महत्त्वाचा ऋतु म्हणजे पावसाळा. शेती प्रधान देश असल्याकारणाने ह्या ऋतूत सगळ्यात जास्त कामं चालतात. ज्यात शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब सहभागी असते. दुसरे म्हणजे सगळ्यात जास्त अडचणी निर्माण करणारा ऋतु म्हणजे पण हाच. मुंबईसारख्या शहरांमध्ये यातायातीची दुरवस्था सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यात मग कुठे पुर येतात, कुठे पडझड होते. अशात विद्यार्थ्यांना हे सगळे सहन करत शाळेत जावे लागते. आणि पालकांना ही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात ज्यांना इतर कुठे जायला परवडत नाही ते पोरं बापडे आपले संपूर्ण सुट्टी दुपारी गावाला घरात बसून उजाड ओसाड माळरान आणि कडक रखरखीत उन्हाळे बघत वाया घालवतात. ही आमच्या गावाकडची कंडिशन आहे, तुमच्याकडची वेगळी असू शकते निसर्गाची भटकंती करायला आणि निसर्गाला जाणून घ्यायला पण पावसाळा हाच ऋतू उत्तम. बहुतेक इंटरेस्टिंग सणसनावळी पण पावसाळ्यातच येतात. घरात गणपती बसतो आणि त्याचा सर्वात जास्त उत्साह असलेलं पोरगं शाळेत पहिली चाचणी देत बसतं. बरं रोग राई वगैरे मंडळी पण याच सिझन मध्ये उगम पावतात ते वेगळे.

एकूण मला तरी हे उन्हाळ्यात सुट्टी देऊन आपल्या भारतीयांना काय साध्य होतं कळत नाही. माझ्या मते सुट्टीची खरी गरज असते पावसाळ्यातच. आता राहिला प्रश्न लग्नसराईचा. तर मुहूर्तही ही सुट्टी बघूनच ठरवत असतात. आणि तसं ही आजकाल ज्याच्याकडे लग्न आहे ते २-४ जण सोडले तर कोणी जेवणानंतर तासभरही थांबत नाही. त्यामुळॆ लग्नसराई मॅनेज होऊ शकते. आणि खरं सांगायचं तर उन्हाळ्यात लग्नाचा कार्यक्रम म्हणजे काय असतो हे जिथे एक ग्लास पाणी मिळायची मारामार तिथे शेकडो पाहुण्यांना पाण्याची सोया करणाऱ्या किंवा भर उन्हात हॉल किंवा मोकळ्या मैदानात घामाघूम होत पंगतीची वाट बघत बसणाऱ्याला विचारून बघा. उद्या समजा शाळांची सुट्टी उन्हाळ्याच्या ऐवजी पावसाळ्यात केली तर आपोआप मुहूर्तही ही तेव्हाचे काढले जातील. आय एम शुअर दॅट कॅन बी मॅनेज्ड…

आता शंभराहून अधिक वर्ष चालत आलेलं सत्र बदलण्याची तशी काहीही आशा नव्हती कारण एक तर तो खूपच मोठा बदल ठरला असता आणि खूप मोठी मानसिक तयारी करावी लागली.नॉर्मली अशक्यच होतं ते .पण कोविड -१९ आला आणि तशी संधी निसर्गानेच आपल्याला दिली आहे शालेय वर्ष हिवाळा ते उन्हाळा असे करून मुख्य पावसाळ्यात सुट्ट्या देण्याची. जेणेकरून शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व सर्वसामान्य पालक, सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकेल.

माझा हा वैयक्तिक विचार आहे आणि तो चुकीचाही शकतो पण मांडायला कोण अडवू शकतं (एक ऍडमिन सोडून ) पण जर त्यात जर काही योग्यता असेल तर ही संधी अजुनही आहे. तुम्हाला काय वाटतं??

— अमोल पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..