हे रेडिओ चे चित्र पाहिले आणि मन चार दशके मागे गेलं. शाळेची तयारी करून वडिलांच्या सायकल जवळ त्यांच्या निघण्याची वाट पाहत उभा असलेला मी आणि कानावर ऐकू येणाऱ्या या जाहिराती –
१. “ये ढेर से कपडे, मै कैसे धोऊ.
अच्छा साबून कौनसा लावू?
कपडो को जो उजला बनादे
उम्र बढा दे, चमक ला दे””
२. “”जो ओके साबुन से नहाये,
कमल सा खिल जाये.
ओके नहाने का बडा साबुन””
३. झुळ झुळ वानी, खेळवा पाणी
आणायचं कोणी? सांगतो राणी.
४. कसला विचार करतो रामण्णा?
अरे घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे वापरावे तेच कळत नाही.
अरे चारमिनार चे पत्रे घेऊन, माझ्या आजोबांनी घराला बसवलेले पत्रे अजूनही शाबूत आहेत””.
५. ट्राय वुमेन्स एरा,
रीड वुमेन्स एरा…….
आणि मग त्यापाठोपाठ ऐकू येणारे उच्चार “” संगीत सरिता !!!!! “”
वरची वाक्य जर तुम्ही सुरात वाचत असाल तर..तुम्ही पण त्या पिढीचे आहात ज्यांनी रेडिओ युग, त्या युगाचा अस्त आणि टीव्ही युगाचा उगम आणि आताचे इंटरनेट युग सर्व अनुभवले आहेत. पण मन मात्र अजूनही त्या रेडिओ युगात अडकलेलं आहे. शाळेत असताना या वर दिलेल्या जाहिराती दररोज सकाळच्या अविभाज्य अंग होत्या.आणि अजूनही मनात वाटतं की कधीतरी एखाद्या सकाळी आपण झोपेतून उठावे, अचानकपणे हे सूर कानावर पडावे आणि लक्षात यावे की आपण एक खूप मोठे स्वप्न पहात होतो आणि शाळेसाठी तयारी करायची वेळ झाली आहे.
— अमोल पाटील.
Leave a Reply