( टीप : खालील माझं वैयक्तिक मत आहे ह्याच्यात कुणालाही सल्ला अथवा लेक्चर देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये)
सालाबादाप्रमाणे यंदाही आपल्याकडे दिवाळी जवळ आल्याबरोबर मेसेज सुरु झालेत – कमी खरेदी करा त्यापेक्षा गरिबांना मदत करा, प्रदूषण करू नका, तेल वाया घालवू नका वगैरे वगैरे
ऍक्च्युली असं आहे की जेव्हा आपण एक वस्तू खरेदी करतो त्याच्या मागे खालीलप्रमाणे लोक सहभागी असतात
१. कच्च्या मालासाठी कच्चामाल जमा करणारे कामगार
२. कच्चामाल उत्पादन करणारे कामगार
३. कच्च्या मालाची डिलिव्हरी करणारे कामगार
४. आर अँड डी विभाग
५. कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत काम करणारे कामगार
६. माल विक्री करणारे सेल करणारे सेल्स स्टाफ
७. मालाची जाहिरात करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी
८. मालाच्या डिस्ट्रीब्युटर्स चे कर्मचारी
९. मालाच्या होलसेल एजन्सीचे कर्मचारी
१०. मालाचे किरकोळ विक्रेते.
आपण खरेदी केलेल्या प्रत्येक मालाच्या मागे एवढ्या लोकांचा सहभाग असतो आणि या लोकांवर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे असल्या मेसेजेस मुळे प्रभावित होऊन समोर दिसणाऱ्या एका गरिबाला मदत करण्याच्या नादात कमी खरेदी करून वरील एवढ्या लोकांच्या दिवाळीच्या सणा वरती आपण पाणी फिरवू शकतो. बरं तर बरं हे वरील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय काही कोट्याधीश नसतात. हे पण शेतकरी, गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात. त्यामुळे परवडेल एवढी खरेदी नक्की करावी आणि आपल्या सोबत इतरांचाही दिवाळी सण आनंदात साजरा होऊ द्यावा असं मला वाटतं.
राहता राहिला प्रश्न समोर दिसणाऱ्या गरिबांचा, तर त्यांना जी मदत करायची ती आपण प्रत्येक जण करतोच, काहीही दिखावा ना करता आणि बाय द वे तुमच्या घरी फराळ बनवायची तयारी सुरूही झाली नसेल त्याच्या आधीच त्यांच्याकडे कुठल्यातरी पक्ष किंवा समाजसेवी संस्थेकडून गरिबांना मोफत फराळ वाटप म्हणून नक्की पोहोचलेला असेल. आणि जर आपण निरीक्षण केलं तर फुटलेल्या फटाक्यांचा सगळ्यात जास्त सडा स्लम एरिया मधेच पडलेला पाहायला मिळतो.
सो, एन्जॉय तो दिवाली अंड अल्सो लेट अदर्स एन्जॉय द दिवाली !!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
— अमोल पाटील.
Leave a Reply