12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला.
आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत होता. सगळे आश्चर्यचकित झाले की आजवर हा प्रकाश कसा लक्षात नाही आला?
तो प्रकाश कसला असावा या बद्दल बरेच तर्क वितर्क लढवले गेले, बरीच चर्चा झाली आणि शेवटी JWST ला त्या भागावर केंद्रीत करून त्याचा डाटा घेण्यात आले.
मिळालेला डाटा जेव्हा इन्फ्रारेड मधून साधारण फोटोमध्ये कन्व्हर्ट करण्यात आला तेव्हा सगळे भयंकर शॉक्ड झाले. जे दिसले ते पाहून सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि आपल्या आधी हे तिथे पोहोचले हे पाहून नासाला लाज वाटली. म्हणून ही माहिती गोपनीय ठेवावी असे वचन सगळ्यांकडून घेण्यात आले.
पण आपल्या आपल्या लोकांमध्ये शेअर करायला काही हरकत नाही म्हणून तो फोटो इथे पोस्ट केलाय. प्लिज कीप द सिक्रेट….
–अमोल पाटील
Leave a Reply