नवीन लेखन...

उगाच काहीतरी -२८

” ओ काका एवढ्या घाईत कुठे चाललात?”
अक्षयने शेजारच्या रामकाकांना विचारले
” अरे अक्षय, ट्रॅव्हल एजेन्सीमध्ये चाललोय. येतोस तर चल” – काकांनी अक्षयला सांगितले. रविवार असल्यामुळे अक्षय पण जरा फ्रीच होता त्यामुळे तो लगेच तयार झाला.
“थांबा काका गाडी घेतो.”
” अरे गाडीचं घ्यायची होती तर मीच नसतो का गाडीवर आलो. इथे जवळच जायचं आहे म्हणून पायी निघालो. तेवढाच व्यायाम” काका एक डोळा मिचकावत म्हणाले.
एकूण आज काकांना काकींनी जबरदस्ती पायी जायला लावलेलं दिसतंय नाहीतर काका कॉम्प्लेक्सच्या गेटवर पण गाडी ने जाणाऱ्यांपैकी होते. अक्षयला एकदम हसू आले.
अक्षय आणि रामकाका यांच्या वयात दुपटीपेक्षा जास्त अंतर होते पण त्यांचं चांगलं जमायचं.
“काका अचानक ट्रॅव्हल एजेंटकडे का? कुठे चार धाम करायला जातंय का?”
” चल रे, चार धाम म्हणे. अरे इंडोनेशिया बाली ला जातोय. त्याचीच काही प्रोसेस पूर्ण करायला बोलावलं होतं एजेंटने “
” अरे वा, सगळे जाताय का “
” मी आणि काकू “
” निखिल आणि फॅमिली?”
” अरे तो जाईल की त्याच्या फॅमिलीला घेऊन. आम्ही दोघंच जातोय”
“च्यायला काका एकदम सेकण्ड हनिमून हं “
” का नको? अभी तो हम जवान है” – काका हसत म्हणाले.
” खरंच काका आता वय काय तुमचं?
” एकावन्न.”
” आणि रिटायरमेंट केव्हा?”
” साठ, का रे ?”
” नाही, बऱ्यापैकी लवकर फ्री झालात जबाबदाऱ्यातून तुम्ही”
” असा आपोआप नाही झालो फ्री. त्यासाठी प्लांनिंग केलं”
” म्हणजे काका ? “
” जाऊ दे रे तुमच्या जनरेशनला आमचं कॅल्क्युलेशन नाही पटणार. छोडो , तू सांग नवीन काय चाललंय ?
” काही नवीन नाही चाललंय. तुम्ही आधी तुमचं प्लांनिंग सांगा कसं केलं? पटो न पटो तो माझ्या जनरेशनचा प्रश्न आहे.”
” ओके ओके सांगतो. प्लांनिंग वगैरे काही नाही फक्त वेळेवर लग्न केलं”
” म्हणजे ?”
” म्हणजे जसा मी जॉब ला लागलो तसा घरच्यांनी विचारल्याबरोबर लग्नाला होकार देऊन टाकला. म्हणजे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लग्न केलं आणि सव्वीसाव्या वर्षी निखिल झाला”
” यात प्लॅनिंग काय आलं? तुम्ही म्हणजे न कुछ भी पकाते हो काका”
” बरं ऐक. अरे सिम्पल आहे. वेळेत लग्न झालं, वेळेत निखिल झाला. आज मी एक्कावन्न आहे आणि निखिल स्वतंत्र आहे. आता मी आणि तुझी काकू सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून आमचं वैयक्तिक आयुष्य जगायला मोकळे आहोत. अजून ८-९ वर्ष आम्ही नोकरी करू शकतो त्यामुळे आमचा कोणावर भार नाही. आणि प्रायव्हेट नोकरी असल्यामुळे मला पेन्शन नाही पुढील ८-९ वर्षात जो काही पगार येईल त्यात रिटायर्मेंट नंतरच्या आयुष्यासाठी बचत पण आम्ही आता करतो आहोत. एकूण वी वोन्ट लाईक टू डिपेंड ऑन एनीवन. नॉट नाऊ नॉर आफ्टर रिटायरमेंट “
” हो पण काका २४-२५ म्हणजे टू अर्ली नं बालविवाहच ना. . एवढ्यात संसाराच्या जबाबदाऱ्या घेत बसलो तर मग आमचं आयुष्य आम्ही कधी जगायचं?”
” बघ, मी बोललो होतो कि तुम्हाला पटणार नाही. मला सांग तुमचं आयुष्य जगणं म्हणजे नक्की काय करणं असतं? म्हणजे मनाला वाटलं तेव्हा बाहेर फिरायला जाणे, मित्रांसोबत पार्टीला जाणे हेच ना?”
आता तू म्हणशील हेच असतं का आयुष्य जगणं तर मी म्हणेन शंभरातले नव्वद मध्यमवर्गीय मुलं यालाच समजतात. उरलेले दहा जे आहेत ते इतर काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यामागे लागलेले असतात. मी त्या नव्वद मुलांबाबत म्हणतोय जे शिकल्यावर नोकरी मिळाली की सेटल झालो समजतात. आणि स्पष्टच बोलायचं झालं तर , ते पण मी पण त्या वयातून गेलो आहे म्हणून ‘ आमचं आयुष्य’ म्हणून जे काही जगायचं म्हणताय त्यात ही तुम्ही काय करता की ऑफिस, पार्टी, पिकनिक इथे कोणी आपल्यावर कोणी इंप्रेस होते का. हेच बघत असता ना. त्यापेक्षा सरळ आपली चांगली शिकली सवरलेली मुलगी बघून लग्न करून घ्यायच आणि तिच्यासोबत एन्जॉय करा लाईफ. हे वयच असं असतं की डोंगराएवढ्या जबाबदाऱ्यापण सहज पेलू शकतो आणि त्यात साथीला कोणी असेल तर क्या बात है. हे खरं आहे की काहींच्या बाबतीत कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त असतात जसं बहिणीचं लग्न, भावाचं शिक्षण पण असे किती असतील? आणि त्यांना ही कोणी सपोर्ट मिळाला तर काय वाईट आहे?”
माझ्या मते एकतर तुम्ही म्हणता त्या प्रमाणे आधी जबाबदारी मुक्त आयुष्य जागून नंतर उरलेलं आयुष्य जबाबदाऱ्यांचा ओझ्याखाली घालवू शकता किंवा मग ज्या वयात हिम्मत, ताकत असते त्या वयात जाबदाऱ्या पार पाडून उरलेली आयुष्याची संध्याकाळ शांतपणे टेन्शन मुक्त जगू शकता. मी दुसरा पर्याय निवडला कारण माझ्या डोळ्यासमोर कित्येक उदाहरणं अशी होती की बापाच्या रिटायरमेंटच्या वेळी पोरगं दहावी – बारावी ला. वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी मग त्याच्या पुढच्या शिक्षणावर खर्च होते आणि मग थकलेला बाप कफ्फलक आणि मुलाचं स्ट्रगल सुरु असतं. त्यात मुलगा सेटल झालाच तर रिकाम्या हाताच्या आई बापाला त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. अरे नातवाला चॉकलेट घ्यायचं असेल तरी त्यांना मुलाकडे हात पसरावे लागतात. आज निखिल सव्वीसचा आहे आणि माझी नात वर्षाची होईल आणि अभिमानाने सांगतो कि माझ्या नातीला आम्ही वाटेल ते घेऊन देऊ शकतो. ती आमच्याकडे हक्काने काही मागू शकते अशी परिस्थिती आहे. निखिल वर ही आमची काही जबाबदारी नाही. त्यामुळे त्याचं कुटुंब त्यांचं आयुष्य मोकळेपणाने जगू शकताहेत. उद्या त्याला जर काही व्हेंचर करायचं मनात आलं तरी अजून काही वर्ष आम्ही त्याला सपोर्ट करु शकतो. पुन्हा दिव्या त्याची बायको पण नोकरी करते ती आहेच त्याच्या सोबतीला.”
” काका हे कॅल्क्युलेशन कधी डोक्यातच आलं नाही हो माझ्या. तुम्ही म्हणता ते सगळं खरं पण त्यासाठी तुमची होणारी बायको पण तशी हवी ना नाहीतर तुम्हाला माहिती आहे आजकालच्या मुली”
” बरं झालं या मुद्द्यावर आलास. परवाच एका संस्थेच्या वधुवर मेळाव्याला जाण्याचा योग आला होता. आपलं काही काम नव्हतं पण आमंत्रण होतं आणि टाईमपास करायला आम्ही दोघे गेलो तिथे. एकेकाच्या अपेक्षा ऐकत होतो. एकूण एक मुलाची अपेक्षा होती – मुलगी शिकलेली, सुस्वरूप असावी, नोकरीला असेल तर उत्तम. आणि मग सर्वात शेवटी एक वाक्य प्रत्येक जण म्हणायचा – ” माझ्या आई वडिलांना मान दिला पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे’. एकानेही असं म्हटलं नाही की मुलीला माझ्या घरात अशी वागणूक देऊ की आमचं घर हे तिला तिचंच घर वाटेल. तिला तिच्या घराची कमी भासू देणार नाही. अरे कोणती मुलगी लग्न करून “थांबा तुम्हाला घराबाहेरच काढते अशा उद्देशाने येते? आणि तुमच्या आई वडिलांचा आदर करावा हे काय टर्म्स आणि कंडिशन असावे का? ” तुम्ही जशी वागणूक तिला द्याल त्या प्रमाणे ती त्याची परतफेड करते. तुम्ही तिला समजून घ्याल तर ती पण तुम्हाला समजून घेईल. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हि जगाची रीत आहे.
आणि मुलींचे बाप तर कळसच. त्यांची यादीच संपत नाही. स्वतः अजून घराचं- लोन फेडताहेत आणि मुलाचं मात्र स्वतःच घर हवं, गाडी बंगला अन परत वरती शेती पण हवी’ मेळावा नाही तर अक्षरशः मूला मुलींचा बाजार वाटला मला. असो तो विषयच वेगळा आहे.
” एनिवे हा माझा विचार आहे आणि तो मी फॉलो केला. निखिल ला पटला त्याने पण फॉलो केला. बाकी सगळ्यांना पटलाच पाहिजे असं काही नाही. मला तू जुन्या विचारांचाछोडो म्हटलास तरी हरकत नाही. “
” अरे काका, ही आली बघा एजन्सी. तुम्ही करा तुमची प्रोसेस. मी जरा मार्केट मध्ये जाऊन येतो. आणि बाय द वे काका, तुमचं ऐकून माझा पण विचार चाललंय की आपुन भी ये साल बँड बजाईच डालंना चाहिये. तुम्ही सांगता माझ्या घरी की मीच सांगू ?”
दोघे जोरजोरात हसले आणि आपल्या आपल्या मार्गाला लागले.
–अमोल पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..