आधीच अरुंद असा खाडीवरचा पूल. सकाळी ९ -९.२५ चा पीक टाइम त्यामुळे त्यावरून ऍज युज्वल शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची अफाट गर्दी. त्यातच शहरात यायच्या बाजूला नवीन पुलाचे काम चालू आणि त्याची धूळ ह्या पुलावर उडू नये म्हणून त्या बाजूचा कठडा उंचपर्यंत कव्हर केलेला.
शहराबाहेर जाणार्यांपैकी स्कूटरवर मी पण एक. अचानक समोरून येणारी ट्रॅफिक एकदम बंद झाली. माझ्यासारखे इतर आणि त्याचबरोबर या बाजूला असलेले पोलीस दादा पण बुचकळ्यात पडलेले.
अर्ध्यावर आल्यावर दिसलं की कानात हेडफोन लावलेल्या एक मिडल एज्ड मॅडम त्यांची स्कूटी पुलाच्या अर्ध्यात लावून त्यांच्या बाजूचा कठडा बंद असल्याने आमच्या बाजूला निर्माल्याची पिशवी पाण्यात फेकायला आलेल्या होत्या. स्कूटीच्या मागे शहरात येणाऱ्या गाड्यांची लांब रांग लागलेली होती. हॉर्न्स वाजत होते. आणि मॅडम मात्र तिथूनच गाड्यांना हात दाखवून ‘मी येते आहे ना. कशाला एवढा हॉर्न वाजवताय?’ असा काहीतरी म्हणत होत्या.
माझ्या पुढच्या रिक्षात मोठ्याने गाणं लागलेलं होतं – ” ओ SS … वुमनिया, अहा .. वुमनिया….. ”
— अमोल पाटील.
Leave a Reply