उगारुनी काठी दुसऱ्या माथी
उपयोग नाही काही
प्रतिबिंब होते बोलके
त्याच वाटेवरती
प्रतिकास धक्का लागून जातो
ठेवता पावलांवरी पावले
पडद्याआड काय घडते
कोण पाहण्या जातो?….
अर्थ:
उगारुनी काठी दुसऱ्या माथी, उपयोग नाही काही
(समोरच्याची चूक सतत दाखवणे म्हणजे काही सत्कर्म नाही, सल्ले देणं चांगलं पण त्यातून चूक दाखवणं केव्हाही वाईटच.)
प्रतिबिंब होते बोलके, त्याच वाटेवरती
(इतरांना शिकवून झाल्यावर आपणही तसेच जेव्हा वागतो तेव्हा आपलेच प्रतिबिंब आपल्यावर हसत असते, पण मी पणा पोटी ते आपल्याला दिसत नाही. )
प्रतिकास धक्का लागून जातो, ठेवता पावलांवरी पावले
(आयुष्यात आदर्श हा असलाच पाहिजे, पण आदर्श म्हणून कोणास बघावे? कोणाला फॉलो करावे?)
पडद्याआड काय घडते, कोण पाहण्या जातो?
(चंदेरी दुनिया, महागड्या गाड्या फिरवणारे खेळाडू यांच्या वर प्रकाशझोत असतो म्हणून ते आपल्याला दिसतात, पण त्यांच्या आयुष्यात असलेले खरे क्षण आपल्याला दिसतात का? त्याच मार्गाने जाण्यास आपण योग्य ठरू का याचा विचार होणे महत्त्वाचे.)
— सुमंत परचुरे.
छान माहिती सर
धन्यवाद