इकडं आड अन् तिकडं विहीर
इकडं सासूबाई अन् तिकडं वसंतरावांची घाई
स्वयंपाकघरात सासूबाई दिवाणाखान्यात मामंजी
दाराच्या फटीतून वसंतराव करतात अजीजी!
कडक इस्त्रीची पँट चकचकीत बूट
त्यावर रुबाबदार शर्ट आणि टाय
कामावर निघाले वसंतराव
परतले का बरं? विसरले काय?
पोळीभाजीचा डबा बिसलेरीची बाटली
आणि रेल्वेचा पास
बॅगेत भरुन निघाले वसंतराव
लांबून करतात किस पास!
लग्नात देऊन जिलेबीचा घास
उखाणा घेतात म्हणे लाजून खास
वसंतरावांना आहे जिलबीचं वावडं
म्हणून भरवते त्यांना वालाचं बिरडं!
उखाणा घ्यायला
मी काय आहे जूनी काकूबाई?
आधुनिक वसंताशी
म्हणूनच दिलजमाई!
जावई रुसला मारुतीसाठी अडला
वसंतराव नाहीत बरे का तसे
त्यांच्या मनात ह्युंदाईच बसे!
— विनायक अत्रे.
Leave a Reply