उमले कळी पर्जन्यात
स्वभाव न बदले उन्हात
पोषक द्रव्ये जमिनीत
रितसर मिळती!!
अर्थ–
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. तेथे कस लागतो प्रयत्नांचा, आधाराचा, कष्टांचा. ऋतू बदलला म्हणून झाडावरची फुलं उमलायची थांबत नाहीत. पावसाळ्यात अति पाणी म्हणून थांबत नाहीत तर उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून. मुळांपाशी असलेलं जल हे जगण्याचं कारण बनतं तर स्वत्व मिळण्याची एकमेव आशा तेथे टिकून असते.
कोणतेही कार्य करताना आव्हानं निर्माण होणारंच आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळणं हे यश मिळण्याच्या बरोबरच आहे. आणि मार्ग नीट असेल तर आव्हानं पेलण्यासाठी कोणाशी आवाहन करावे लागत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply