उमलत्या फुलांत गंध सारे
अलगद बेधुंद मन व्यापून आहे
मोगऱ्याचे आल्हाद धुंद बहरणे
जीव गुंतून हलकेच बावरुन आहे
कळ्यांचे गाणे फुलांशी जोडले आहे
नाजूक कळ्यांत श्वास वेढून आहे
पानांत हिरव्या मन ओलं जपून आहे
मोहक निशिगंध अंतरी फुलून आहे
लाजून अबोली केसांत माळून आहे
ओल्या स्पर्शात प्राजक्त गंधाळून आहे
प्रियेचे लाजणे रातराणीत लपून आहे
प्रेमाचे प्रतीक गुलाब मोहक सजले आहे
प्रत्येक फुलांत सजून प्रीत हृदयी आहे
केवड्याचा गंध केसात भरुन आहे
अबोल प्रीत लाजरी प्रियेच्या स्पर्शात आहे
फुलांचे गाणे अलवार चाफ्यात दरवळून आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply