उमलून जाते फुल
प्रारब्धास अनेक मोल
तरी भक्ती रसात सखोल
स्थान मिळते!!
अर्थ–
आपण काय म्हणून जगतो, काय म्हणून कर्म करतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे सगळं विचार करण्यास भाग पाडत असलं तरी कधी कधी आपली पेक्षा आपल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही ना? याचा विचार करणे जास्त महत्वाचे ठरते. केवळ स्वतःचा विचार करून जगणे चुकीचे नाही पण कधी कधी स्वतः पेक्षा दुसऱ्याचा विचार करून त्याच्या आनंदात सुख शोधलं तर आपलं काम जास्त वेळ लक्षात राहू शकतं.
फुलं उमलतात ती काही देवाच्या पायाशी जावं म्हणून नाही, काही फ़ुलं देवाच्या पायाशी, शिरावर , करांवर, कर्णामध्ये विराजमान होतात. पण त्यांचेच दुसरे रूप एखाद्या जीव गेलेल्या शरीरावरही चढवली जातात पण त्या मुळे त्यांचे महत्व कधीच कमी होत नाही. तसेच माणसाने केवळ आपला विचार न करता दुसऱ्याचा विचार करून त्याच्या साठी जगणं किंवा एखादं कर्म करण्याने त्याचे महत्व कमी होत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply