उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते यांचे शिक्षण १२ वी आर्टस पर्यंत. त्यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी कोकणातील आडिवरे येथे झाला. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली उदय गोखले यांचे श्री. महाकाली मंदीरात भजन होते ते गाणं ऐकताना या सुरांशी आपले काहीतरी अनामिक नाते आहे याची त्यांना पहिली जाणीव झाली या नात्याच्या ओढीतून शोध सुरु झाला आणि शोधातून अस्वस्थता. अर्थात केवळ संगीताचा ध्यास घेऊन चालणारे नव्हते. कौटुंबिक जबाबबदा-यांचा ससेमिरा त्यांच्या मागे सुध्दा होता, त्याच दरम्यान व्यवसाय म्हणून त्यांनी खाजगी प्रवासी वाहतूक हा व्यवसाय चालू केला.
दळणवळणाची साधने आणि संपर्क याची सोय नसल्यामुळे कोणत्याही गुरुकडे जाऊन संगीत शिक्षण घेणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून संगीत मार्गदर्शक पुस्तके आणि कॅसेट्स यांनाच गुरु मानून त्यांनी एकलव्य साधना सुरु केली. त्यांच्या संगीत वेडाच्या साधनेत पहिली अधिकृत मोहर आकाशवाणीच्या ऑडिशनच्या माध्यमातून १९९९ साली उमटली. या छोट्या यशाने त्यांना पुढील प्रवासाला प्रेरणा मिळाली. त्या१च दरम्यान आकाशवाणीचे संगीतकार अवधूत बाम आणि चिपळूणातील राजाभाऊ शेंबेकर (पं. रामभाऊ मराठे व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य) यांचा परिचय होऊन उमाशंकर दाते यांना मार्गदर्शन मिळू लागले. सांगितिक क्षेत्रातील दर्दीशी परिचय, चर्चा होऊ लागली पण व्यवसायाची कसरत जमेनाशी झाली. अर्थात संगीत सोडणं शक्य नव्हतं.
उमाशंकर दाते यांनी व्यवसाय म्हणून केबल टिव्ही नेटवर्क आणि डी.टी.एच.सर्व्हीसची एजन्सी हा व्यवसाय २००१ साली सुरु केला. त्याच दरम्यान त्यांचा एक संगीत नाटक बघण्याचा योग आला. ऑर्गन हे वाद्य महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय झालं ते या संगीत नाटकांमुळेच. उमाशंकर दाते यांच्या जीवनाला भविष्यात कलाटणी देणारी घटना घडली. जेव्हा त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम ऑर्गन पहिला. ते ऑर्गन च्या प्रेमात पडले ते सुर सारखे कानात वाजू लागले. उमाशंकर दाते यांनी त्या आधी आणि Leg Harmonium हि वाद्ये होती. इथून ऑर्गन मिळवण्यासाठी धडपड चालू झाली. त्याच वेळी त्याची दुर्मिळता लक्षात आली कारण सामान्यत: अमेरिका आणि युरोप या देशातच ऑर्गन बनवले जात होते. पण १९५० च्या दशकानंतर ही चळवळ मंदावली. त्यानंतर Electronics च्या युगाचा प्रारंभ झाला. भारतात तर फक्त Harmonium बनविणा-या कंपन्या होत्या ऑर्गन बनवणारी एकही कंपनी नव्हती किंबहूना ऑर्गन चे अधिकृत ज्ञानही कोणाला माहित नव्हते. त्यामुळे जुना ऑर्गन मिळवण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्या कडे नव्हता. खरतर परदेशात जाऊन तेथील उत्तमोत्तम ऑर्गन चा अभ्यास करावा, ते तंत्र आत्मसात करावं असं त्यांना अनेकदा वाटल पण आर्थिक समस्या आणि मार्गदर्शनाचा अभाव यामूळे हे केवळ अशक्यच होते. मात्र ऑर्गन ची शोधाशोध सुरु होतीच. पण पुन्हा एकदा व्यवसायानं दगा दिला आणि चालू असलेला व्यवसाय बंद झाला. त्या तच वडिलांचे छत्र हरपले. आणि कुटुंबाची व त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांदयावर आली.
वडिलांचा Electrical maintenance व किराणामाल दुकान हा व्यवसाय ते करु लागले. पण ऑर्गन चे वेड त्यांच्या डोक्यातून जाई ना. तोपर्यंत या सर्व काळात त्यांची सांगितीक प्रगती चांगली झाली होती. संगीत क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींशी माझा संबंध वाढला होता Harmonium साथीदार म्हणून ते ब-याच ठिकाणी जात होते. त्यावेळी मुंबईस्तिथ मुकुंद आठवले यांच्या ओळखीतून एक जुन्या ऑर्गन चा Sound Box मिळाला.त्यापासून ऑर्गन बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला. जवळच श्री. वामन मेस्त्री (Harmonium Maker) यांच्या सहकार्याने ऑर्गन उत्तमबनला माझ्या कडील ऑर्गन फार चांगला असल्यामुळे संगीत क्षेत्रातील बरीच मंडळी तो ऑर्गन बघण्यास येऊ लागली आणि बऱ्याच मित्रांनी आम्हालापण असा ऑर्गन मिळवून दे अशी त्यांना विनंती केली. ब-याच Harmonium makers बरोबर ऑर्गन या विषयावर चर्चा केल्यावर ते करणे अशक्य आहे असे सांगितले पण हे बाळा दाते यांच्या बुदधीला पटत नव्हते. कारण जी गोष्ट १५० वर्षापूर्वी होऊ शकते ती गोष्ट आताच्या आधुनिक युगात अधिकच उत्तम व्हायला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. त्यांची तंत्रज्ञानाची आवड, जिज्ञासू वृत्ति आणि डोक्यात सतत वाजणारे ऑर्गन चे सूर यांनी भारतीय बनावटीच्या पहिल्या ऑर्गन चा त्यांनी संकल्प केला आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारायचे ठरविले.
बाळा दाते यांना Automobile, Mechanical & Electrical Engineering या बद्दल प्रचंड आवड व थोडे फार ज्ञान होते. त्याचा उपयोग ऑर्गन manufacturing या Challenge मध्ये होईल असा त्यांना विश्वास होता. १५ डिसेंबर २०१० साली एकाच दिवशी दोन आवडीच्या क्षेत्रात नोकरी करण्याचे प्रस्ताव बाळा दाते यांच्या समोर आले. एक संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये होती. अनेकांशी चर्चा करुन त्यांनी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाकडून सन्मानपूर्वक संगीत शिक्षकाच्या पदाच्या दिलेल्या जबाबदारीचा स्वीकार केला. या नोकरीतून त्यांना आर्थिक स्थैर्य आणि संगीत उपासनेला बळ मिळाले. त्याच वेळी ते राहत असलेल्या आडिवरे गावात इंटरनेट ची सुविधा सुरु झाली आणि त्यांचा घरच्या घरीच ऑर्गन विषयाचा अभ्यास सुरु झाला. अमेरिकेतील एका मित्राकडून सुमारे 50 ऑर्गन चे Reeds जमविल्यानंतर त्यांनी ऑर्गन बनवण्यासाठी करण्यासाठी प्रयन्त सुरु केले. त्यासाठी एका जुन्या ऑर्गन चा Reed board मिळवून Measuring करुन Reference शोधून काढले.
त्याचबरोबर ऑर्गन वरील अनेक पुस्तके मागवून अभ्यास सुरु केला. हे करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये आर्थिक अडचण ही होतीच, परंतू त्याच दरम्यान त्यांना बेंगलोर येथे Imperial organ and piano co. LTD. London या make चा एक double keybard चा अप्रतिम ऑर्गन मिळला. या ऑर्गन मुळे अभ्यास करणे अजून सोयीचे झाले.
ऑर्गन चा मुख्य part Read Holder आणि Sound Pan हे आहेत. हे बनविण्यासाठी त्यांनी स्वत: एक लाकडी Milling Machine तयार केले. त्यावर 23000 RPM चा Spindal बसवला कारण Milling Machine घेणे हे आर्थिक दृष्टया शक्य नव्हतं त्यांनी बनवलेल्या Milling Machine वर पहिले 5 ऑर्गन बनवले. प्रयोग आणि प्रयत्न 100% यशस्वी झाले. आता यामध्ये काम अजून prisies होण्यासाठी योग्य प्रकारची machinery घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 2014 मध्ये Bridgeport या कंपनीचे M1TR Milling Mchine घेतले. त्याचप्रमाणे Milling Cutters Design करुन बनवून घेतले.त्यामुळे कामाची Accuracy 0.10 Micron एवढी मिळायला लागली. यासाठी उत्तम प्रतीचे लाकूड मिळवले sound box साठी Pine wood, German sprus, Keyboard साठी aster, body साठी beech wood, teak wood यासारख्या लाकडांचा वापर करावा लागला. Sound Box बनवताना जास्तीत जास्त Machine चा उपयोग कसा करता येईल याचा विचार करुन Pallet च्या Guide pins चे hole one time करायला लागलो. सर्व Guiude pins सुद्धा stainless steel च्या वापरु लागलो. जास्तीत जास्त precision काम कस होईल याकडे जास्त लक्ष दिले. Key board चे Guide pins slots सुध्दा Milling Machine वर करु लागले.
Wood stump ऐवजी ते Alluminium चे Rod वापरायला लागलो. त्यामुळे वातावरणातील बदलाने key board अडकण्याची शक्यता 0% झाली ऑर्गन वापरायला सोपा होण्यासाठी Transporting key board हि सोय केली ( 1 Note + / 1 Note -) वापरण्यात येणारे Reeds Ultrasonic cleaning machine मध्ये clean करु लागलो easy maintainance साठी sound box आणि bellow frame एकमेकावर Hingesच्या सहाय्याने fitting करण्याची पदधतही सुरु केली त्यामुळे maintenance करतांना स्क्रू काढायचा वेळ आणि त्रास कमी झाला आणि काम करणे सोपे झाले main bellow साठी high quality recxine आणि sub bellow साठी कार्ड बोर्डचा वापर करु लागले bellow spring सुध्दा स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घ्याव्या लागल्या अशा प्रकारे high quality ऑर्गन बनवू लागलो. Tuning च्या वेळी manometer वापरु लागलो आतापर्यंत 44 ऑर्गन तयार झाले त्यामध्ये 5 octave, 4 octave, 3.5 octave असे ऑर्गन बनवले गेले. सामान्य पणे ऑर्गन चे वजन 35 ते 50 किलो च्या आसपास असते प्रवासातून नेण्या आणण्यासाठी गैर सोयीचे होते म्हणून 18 ते 22 किलो इतक्या कमी वजनाचे ऑर्गन बनवायला लागले. या सर्व कामाची दखल आदित्य ओक यांनी घेऊन ABP माझा या न्यूज चॅनेल वर interview चा स्पेशल कार्यक्रम केला. या कार्यामूळे लोकमान्य सेवा संघ मुंबई या संस्थेकडून पंडीत रामदास कामत या श्रेष्ठ कलाकाराकडून सत्कार झाला. आदित्य ओक यांच्या जादूची पेटी या कार्यक्रमात ते बाळा दाते यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतात. दिनांक २५ जुलै २०१६ रोजी दुनियादारी फाऊंडेशन यांच्याकडून स्वराधिश सुधीर फडके (विशेष) पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच चित्पावन उद्योजक मंच मुंबई यांच्याकडून उद्योगश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Mtv मध्ये ग्रेट संगीतकार आणि फिल्म निर्माते विशालजी भारद्वाज, तसेच शंकर महादेवन यांनी कट्यार चित्रपटात याचा वापर केला, राज्याचे सास्कृतिक मंत्री विनोद जी तावडे यांनी त्यांच्या आडिवरे येथील कारखान्यास भेट देऊन संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्या प्रमाणे कार्यवाही सुरू केली. पंडीत तुलसीदास बोरकर, पं. विश्वनाथ कान्हेरे, डॉ. विद्याधर ओक ( 22 – Shruti Harmonium scientist) या सर्व लोकांनी त्यांच्या या सर्व कामाचे कौतूक केले. त्यांचा ऑर्गन ‘एमटीव्ही अनप्लग्ड’ मध्ये वापरला गेला व एमटीव्ही अनप्लग्ड याची नोंद घेणे म्हणूनच महत्त्वाचे आणि आश्वासक आहे. तसेच सर्व मराठी वृत्तपत्र आणि DNA English-Web या सर्वांनी याची दखल घेतली त्यामुळे संपूर्ण जगाला त्यांच्या कामा विषयी माहिती झाली या मध्ये फेसबुक चा फार उपयोग झाला. यातूनच David Este या अमेरिकन माणसाची ओळख झाली या संगीत प्रेमी आणि धडपडीला प्रोत्साहन देणा-या माणसामुळे बाळा दाते यांच्या Reeds manufacturing संशोधना मध्ये मोलाची मदत मिळत आहे. David मूळेच NED PHOENIX या अमेरिकन शास्त्रज्ञाची ओळख झाली. त्यांनी Reed manufacturing बददलची अत्यंत महत्वाची माहिती त्यांना Handover केली. त्या प्रमाणे reeds manufacturing project चालू आहे.
अजून एक नवीन special purpose Machine बनवण्यावर Research चालू आहे. Milling Machine मध्ये alteration करुन त्याला learner Guideways, 20000 RPM spindle आणि digital Readout system या गोष्टींचा समावेश् असेल. यामुळे कामाची accuracy 0.005 micron एवढी मिळेल. या सर्व प्रवासात त्यांना हेमंत लिंगायत, संजय तारळकर, सुहास पांचाळ, किरण नांदगावकर आणि संदेश पांचाळ या त्यांच्या सहकारी कारागरांची फार मोलाची मदत झाली.
२००२ साली पहिला ऑर्गन त्यांनी पाहिला तर २००५ साली ऑर्गन चा sound box हाती आला आणि २०१३ साली पहिला भारतीय बनावटीचा ऑर्गन ते बनवू शकले. आत्तापर्यंत ८० हून अधिक ऑर्गन त्यांनी तयार केले आहेत. त्यांच्याकडे ६५ हजार रुपयांपासून १ लाख २० हजार रुपयांर्पयच्या किमतीचे ऑर्गन बनवून दिले जातात. आता त्यांना ध्यास आहे पेटंट मिळविण्याचा. अनेक नामांकित कंपन्यांनी ऑर्गन बनवणे वेगळी गोष्ट आहे आणि खेडयातील एका सामान्य तरुणाने एकाकी प्रयत्नातून ऑर्गन बनवणे केवळ दैवी लिलाच असू शकते.
त्यांनी आपल्या अभ्यासपूर्वक आणि कौशल्यपूर्ण कामाने वाद्यनिर्मितीला नवसंजीवनी दिली आणि कोकणवासीयांना नवीन उद्योगधंद्याची संधी निर्माण करून दिली. १९५० नंतर अमेरिका आणि युरोपमध्ये ऑर्गनची निर्मिती जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. ही बाळा दातेंसाठी जमेचीच बाजू म्हणायला हवी. लवकरच ऑर्गन निर्मितीमध्ये बाळा दाते यांची मक्तेदारी झालेली बघायला मिळाली तर नवल वाटायला नको!
संपर्क. ‘बाळा ऑर्गन ॲॅण्ड म्युझिकल’
उमाशंकर उर्फ बाळा दाते भ्रमणध्वनी. ९४०५९५५६११
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट / बाळा दाते
श्री. दाते यांच्या ऑर्गन नवनिर्मितीच्या ध्येयाने अमेरिकास्थित ७५ वर्षीय शास्त्रज्ञ नेड फोनिक्स हे कमालीचे प्रभावीत झाले. त्यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार
I checked out the guy in India who makes auction organs. Pretty amazing. He is a mad scientist who makes it all by hand with an old English milling machine and his friends CAD router. So were all the original inventors and developers of reed organs. Good for him! Good for you!I suppose I am also a mad inventor: Several times I reinvented the 2MP RO concept, and 30 years ago arrived at what I think is the design that is for sound the most efficient and most musical (of course, this is Not the simplest to build :-)He is even looking into making his own reeds next and I think he can do it. He currently buys old sets on eBay. He has sent samples to the top labs in India to get the metal make up of the brass. Please forward all this information to this maker. Because of his good work, he deserves to know these important things so he can improve his reed organs for the best playability and longevity.I hope all this helps you make your decisions.I would be happy to receive an email from David, and also from the reed organ maker in India if he would like to write.Best wishes,
– Ned PhoenixPhoenix Reed Organ Resurrection593 Phoenix Way, Townshend, VT 05353
शतशः धन्यवाद.. माझा विश्वास बसत नाही जो पर्यंत मी आपणास भेटत नाही, कारण माझी ऑर्गन शिकण्याची बरेच वर्षापासून तळमळ आहे. आपण माझा विद्यार्थी म्हणून स्विकार करावा.
आपला नम्र ःः पद्मनाभ टोणपे, सातारा.
Welcome,9405955611