उंची त्याने गाठून पाहिली
बांधिला अजोड किल्ला
पाणी नव्हते माथ्यावरती
फुकट गेला सल्ला!!
अर्थ–
संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता. स्वकीय सुद्धा वतनाच्या लोभासाठी औरंगजेबाला सामील होत होते. पण या अवघड परिस्थितीत सुद्धा संभाजी राजे आणि त्यांच्या साथीदारांनी हिंमत हरली नाही, कारण त्यांच्या मागे भक्कम आधार होता स्वराज्यातल्या किल्ल्यांचा. किल्ले किती महत्वाचे होते याचं एक इतिहासात सोनेरी अक्षरात लिहून ठेवलेले उदाहरण म्हणजे “किल्ले रामशेज”
नाशिक जिल्ह्यातील हा किल्ला शरीराने बारीक म्हणजे अवाढव्य नाही तर उंचीनेही बुटका म्हणजे अगदीच ठेंगु, किल्ल्याची वाट काही खूप अवघड किंवा कड्यातून चढणारी ही नाही. पण हा किल्ला औरंगजेबाच्या सैन्यास जिंकून घेण्यास तब्बल साडे६ वर्षे लागली. त्याची कारणे खूप आहेत पण मुख्य कारण म्हणजे किल्ल्याच्या अंगावर जास्त झाडी किंवा झुडपं नाहीत हे शत्रूच्या सैन्यास समजलेच नाही. अखेर साडे६ वर्षांनी किल्लेदाराने किल्ल्याच्या चाव्या शत्रूच्या हातात दिल्या आणि अभय मिळवून किल्ला सोडला. शत्रूने रामशेजच्या उंचीचा एक लाकडी पूल समोर बांधण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यावरूनही माथ्यावर मारा करता येईल पण तेही त्यांना जमले नाही आणि त्यांचा इतक्या वर्षांनी जिंकूनही पराभव झाला.
यातून शिकायचे एवढेच, सल्ला घ्यावा, द्यावा, कुणाचा घ्यावा, कुणास द्यावा, आकारमान लहान म्हणजे ते दुबळे होत नाहीत आणि भव्यता म्हणजे विजय असंही नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply