उन्हाळे-पावसाळे हिवाळे,सृष्टीचे चक्र अव्याहत,
कोण चालवते त्याला असे,
तोचि एक भगवंत,–!!!
सावली उन्हामध्ये पडते, विधात्याची किमया सतत,
ती देहापुढे – पुढे राहते,
विज्ञानच लपले निसर्गात,–!!!
सागरातून लाट उफाळते,
लाटांचे अशा अधांतर,
या नेत्रसुखद सौंदर्याचे,
रचिता कोण सांगा तर,–!!!
रहस्य जिवाच्या जन्माचे,
मानव काहीसे उघडत,
प्रकार किती ते मृत्यूचे,
नाही कोडे उलगडत,–!!!
डोंगर-दऱ्या विसंगत,
असते त्यांची सदैव संगत,
भयावह कपारी, कडे,
कोणाकडून ते निर्मित,–!!!
विपुल असती फळे-फुले,
अतिरम्य या भव्य सृष्टीत,
सुंदर किती वाखाणण्याजोगे,
कोण त्यांना रंग रूप रस देत,–!!!
नैसर्गिक सुगंध ते,
फळा फुलातून कसे साठवत, कस्तुरी दुर्मिळ मृगात सापडे,
कुठेच नाही, त्यांच्या नाभीत,–!!!
पुन्हा त्याला पत्ता नसे ,
काय आहे त्याच्यातअलौकिक, त्याचे त्याला कळत नसे,
तो भगवंताचा दूत एक,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply