आजच्या दिवशी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची (युनो) स्थापना करण्यात आली.
‘युनो’चा उद्देशच जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे हा आहे. ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मार्फत पार पाडली जाते. पाच स्थायी सदस्याच्या स्वत:च्या सैन्यामार्फत ती पार पडणे अपेक्षित असते. जागतिक शांतता धोक्यात आणणारी कोणतीही घटना ज्यात युद्ध, आक्रमण, गृहयुद्ध, अराजकतेमध्ये हस्तक्षेप करणे यांचा समावेश असतो. शांतिसेना किंवा शांती सैनिक मोहिमांबाबत ‘युनो’च्या घटनेत स्पष्ट उल्लेख नाही. युनोजवळ स्वत:चे सैन्य असावे की असू नये? यावर मतमतांतरे आहेत. परंतु जगातील काही देशांमध्ये असलेली अराजकता लक्षात घेता शांतता रक्षक दलाची गरज असल्याचे कोणीही शहाणा माणूस सांगू शकेल. आज शांतता मोहिमांच्या मागणीत व कामात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने केवळ सैनिकचे नव्हे तर बरोबरच पोलीस, महिला रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
१९४८ ते आजपर्यंत ६९ मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यापैकी १६ मोहिमा आजही सुरू आहेत. यासर्व शांतता मोहिमांमधील सहभागी शांतता रक्षकांची संख्या १,१८,००० इतकी आहे. १९४८ पासून ते आजपर्यंत ३,२२३ शांतता रक्षकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. ज्यामध्ये सैनिक, सैन्य अधिकारी, पोलीस, नागरी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वर्ष २०१६ मध्ये १२९ शांती रक्षकांनी जगभरात शांतता रक्षणार्थ बलिदान दिले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply