हे सर्वांनाच लागू आहे ….सावधान !!!!.
आपण सध्या unsafe mode मध्ये व्यवहार करीत आहोत.तुमचे लोकेशन, डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,online खरेदी ,whats app ,फेसबुक या सर्व नव्या गोष्टींचे अप्रूप असल्याने आपण त्या सर्वांच्या आहारी गेलो आहोत .तुम्ही फेसबुक वरून सुद्धा लॉग इन करून खरेदी करू शकता. तुमचे लोकेशन ,तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर ,सर्व काही सार्वजनिक झाले आहे.
तुम्ही एखादी नवी वस्तू खरेदी करण्यासाठी एखादी साईट उघडली कि लगेच फेसबुक वर तुम्हाला त्या वस्तूच्या बाबतीत जाहिराती दिसायला लागतात. तुम्ही ज्या ठिकाणी फिरता त्या ठिकाणी ज्या वस्तू घेतल्या किंवा एखाद्या हॉटेल मध्ये गेलात कि लगेच त्या हॉटेलची सर्विस कशी आहे हे तुम्हाला मोबाईल मध्ये एखादी विंडो उघडली जाते आणि तुम्हाला विचारले जाते.google map तुम्ही वापरता त्यामुळे हे होते.
व्होडाफोन तर तुम्हाला न विचारता अनेक सर्विसेस चालू करते.तुमचे पैसे आपोआप वजा होतात.अश्या शेकडो तक्रारी मोबाईल गैलरी मध्ये येऊन थडकत आहेत.
तुमचे मोबाईल account सहज चुकीच्या माणसाच्या हातात पडू शकतो. या बाबतीत मी माहिती गोळा करीत आहे.मोबाईल चा स्क्रीन लॉक करण्याची सवय ठेवा .त्यासाठी पिन नंबर असतो .
१) तातडीचा उपाय म्हणून फेसबुक वरून तुमची खासगी माहिती काढून टाका. शक्यतो online खरेदी करणे टाळा. अनोळखी माणसाला फोन वर तुमचे कोणतेही खाते वगैरे बाबत माहिती देऊ नका.
२) कुणी अनोळखी माणूस अथवा महिला तुम्हाला फोन करून तुमची सर्व माहिती आधी तुम्हाला सांगेल .त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर लिंक झाला नाही असे सांगेल त्यासाठी तुमचा बँक अकौंउट नंबर मागेल , डेबिट कार्ड नंबर मागेल ,तुम्हाला एखादा OTP पाठवला जाईल ,तुम्ही जर तुमचा OTP दिलात तर तुम्ही संपलात …..!! तुमची बँक खाली झालीच म्हणून समजा.
३) कुणालाही तुमचा OTP कधीही फोन वर सांगू नका .हे सर्व फोन उत्तर प्रदेश ,झारखंड, बिहार ,हरियाणा या प्रांतातून येतात.तुमच्या मोबाईल सिम किंवा मोबाईल नंबर HACK होण्याचे प्रकार खूप वाढले आहेत .या बाबत मोबाईल कंपनीत तक्रार करून काही फायदा होत नाही .तुमचे सिम बदलूनही उपयोग नाही .तुमचा नंबर दुस-या मोबाईल कंपनीत पोर्ट करा. तुम्ही तुमचा आहे तोच नंबर ठेऊन कंपनी बदलू शकता.या बाबत नेट वर सर्व माहिती उपलब्ध आहे.तुम्ही कितीही वेळा तुमचा नंबर पोर्ट करू शकता यासाठी ७ दिवस लागतात .आणि ९० दिवस कमीत कमी तुम्ही सध्या ज्या कंपनीची सेवा घेता त्या कंपनीतून तुम्ही सर्विस घेतली पाहिजे.९० दिवस सेवा घेतल्यावर तुम्हीतुमचा नंबर पोर्ट करू शकता .
४) असे घडले तर पोलिसांकडे तक्रार करून FIR करायला सांगा .त्या FIR ची कॉपी तुमच्या कडे जपून ठेवा .बँकेला लगेच लेखी कळवा.त्याची पोच पावती घ्या .
५)सर्वात महत्वाचे तुम्ही ATM केंद्रात जाल तेव्हा तुमचा पिन टाकताना एका हाताने कि बोर्ड झाका आणि दुस-या हातानी पिन टाका .पिन टाकताना मागे कुणी उभे असेल तर पिन नंबर टाकू नका.बँकेचा टोल फ्री नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा . बँकेच्या ज्या शाखेत तुमचे खाते आहे त्या शाखेचा नंबर आणि बँकेच्या मनेजर चा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा.काही शंका आल्यास बँकेशी लगेच संपर्क साधा .
६) तुमचा ई मेल सतत तपासा .पासवर्ड बदली करत राहा.SMS ताबडतोब पाहायची सवय लावा .
काळजी घ्या !!! दिवस चांगले नाहीत .फसवणूक करणारे मोकाट आहेत . सरकार आणि पोलीस गाफील आहेत .तुम्हीच तुमची काळजी घ्या.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply