नवीन लेखन...

उपरं प्रेम 

प्रेम प्रेम म्हणजे नक्की नक्की काय असत तुमच आमचं सेम असतं. असो पण पवित्र निर्मळ पाण्यासमान असलं तरच त्याची गोडी राहते.त्यात भांडणांचा तिखट मसाला अन रुसवा फुगवाचा लिंबूसमान कडवट पणा असला की प्रेमाची रेसिपी कशी छान होतं ना अगदी तोंडाला चटक लाऊन जाणारी असते. असल्या पद्धतीनं प्रेम फुलत असत. प्रेत्येकाला हव हवस वाटणारं अन मजेनं त्याचा गोडवा चाखरे बरेच असतात.पण हा गोडवा कायम चाखायला मिळणारे फार कमी असतात.कुठल्यातरी भेटीच्या कारणातून प्रेमाचा उगम होतो.अन लग्न अन मैत्री यांतील संबंध निर्माण होतात .दोघानाही प्रेम अन प्रेमातून अगदीची जवळीक हवी असते.या सगळ्यांतून समाज काय काय म्हणेल असले संकोचीत विचारांच्या पलिकडे वेगळ नातं निर्माण झालेल असत .ते दोघानाही स्विकारलेलं असतं. काही स्वत:चे नियम अन अटी असलेलं हे नातं बरीच वर्ष टिकवलं जात किंवा गरजेपर्यंत अन हव तितपर्यतच नेलं जात .
मैत्री मैत्रीतून प्रेम प्रेमातून लिव्ह अन रिलेशन जे दोघ विशिष्ट अटींनी बांधलेल नातं टिकवत असतात तसा प्रयत्न करतात पण शेवटी त्यांना वेगळच व्हायच असत किंवा गरज संपलेली असते.कारण नात तेवढ्यापुरताच असतं .स्वत: ला मोकळीक हवी असते .दोघांनी कुणाशीही काहीही नात जोडलं मैत्री केली तरी किंवा ……असो असले नाती टिकवली जातात.लग्नावरील विश्वास सद्ध्याची पिढी लग्नाच महत्व नकोसं करुन टाकणारी पिढी अस मोकळीक स्वतंत्रता यासाठीच जगणारी पिढी निर्माण झालीय.
पैसा जॉब अन स्वत: एवढ आयुष्य असलेली लोक ज्याच्याबरोबर राहतात त्याच्याशीही व्यवहार करुन राहतात मग व्यवहार ,गरज संपली कि नात पण संपलं .
प्रेमात व्यवहार अन लग्नात पण व्यवहार कधीच नसतो.त्यात त्याग असतो दोन जीव नसतात तर ते लग्न झाल्यावर एक झालेली असतात.मन जुळलेली असतात विश्वास निर्माण झालेला असतो अविश्वासाला कधी थाराच नसतो.लग्न म्हणजे त्याग अन जोडीदाराची केलेली आजन्म स्विकृती मग ती आपल्या मनाविरोधात कधीच नसते किंवा तस मानलही जात नाही.संसार हा शब्दच खुप मोठा आहे अन यातच सर्व विश्व सामावलय.कदाचित तस जानवत नसेलही पण ते सत्य आहे.
हल्ली लग्नाच्या अगोदर दोघाना ओळण्यासाठी लिव्ह अन रिलेशन शिप मध्ये राहतात मग शरिराने अन मन जुळली की लग्न करतात.म्हणजे पहीले पदार्थ चाटून बघयचा मग तो कसा आहे याचा निकाल द्यायच अन नाही जमलं तर वेगळ व्हायच.
ह्या सार्या भानगडीत दोघही एकटे पणाचा मनातला काटा अगदी सहज काढतात.पण सारं यांना हव तस असलं तरी भविष्य फार कठीण आहे हे मात्र खर आहे.चेतन भगतची हाफ गर्ल फ्रेंड तर अजून आहेच .
संस्कृती विषयी बोलायच झाल तर सद्ध्या यांना जेल मध्ये कोंडल्यागत होत असावं म्हणून जेल च्या बाहेरील हा सारा प्रकार असावा.पण संस्कृतीच्या संस्काराच्या बाहेरही ही सुरक्षित कधीच नसतात.मोकळीक स्पेस हव तस हव ते वागण्याचा .फुलपाखरासमान या फांदीवरुन त्या फांदीवर जाण्याची मोकळीक पण फुलपाखराच आयुष्य मात्र कमी असत.शेवटी संस्कार अन संसार महत्वाचाच असतो.सुखाचा त्याग करावा लागतो दु: खाला आपलंस करावच लागत दु:ख सुख हा क्रम वर्षांवर्षे चालतच राहील. आपणावर सारं काही अवलंबून आहे.बाकी सारं काही उपरंच असतं मग ते प्रेम का असेना.
— विरेंद्र प्रदीपराव सोनवणे 
8888244883

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..