नवीन लेखन...

अमेरिकेतील नगररचना

मानवी संस्कृतीच्या विकासात नगररचनांना महत्त्वाचे स्थान आहे. जुन्या गाव गाड्यांसंबंधीच्या लेखनात गावाच्या मध्यवर्ती, उंच जागी देऊळ असायचे आणि देवळाचा आकाशात फडकणारा ध्वज दूरवरून दिसला तर गाव जवळ आले अशी खात्री पटावी. मग देवळाच्या भोवताली आळ्या असायच्या.. आपल्याकडे रस्ते सरळ रेषेत असावेत असा कटाक्ष नसायचा..घरेही. भूमितीचा काटेकोरपणे वापर करून काटकोनात रस्ते तयार करून अपवादानेच बांधली जायची.

अरब देशांमध्ये, युरोपमधील शहरांमध्ये उंचसखल भागात कुठेही, कशीही प्राचीन काळात नगरे वसवली गेली आहेत.

वाळवंटाच्या टापूत तर हा विचार अशक्यच.

मात्र अथेन्स वा मोहोंजदरो संस्कृतीत काटकोनी वा समांतर रस्त्यांचा विचार तेव्हा केला गेला होता असे दिसते. आधुनिक काळात तर वैज्ञानिक प्रगतीबरोबर गणिताला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि त्याचा कसोशीने वापर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला. अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले.

त्यामुळे इमारती, रस्ते उंचसखल भागात बांधलेल्या. पण ही रचनाही अशी की भूमितीचा काटेकोरपणे वापर केलेली आहे. याचा साक्षात प्रत्यय आपण त्या शहरात पोहोचल्यावर येतो. त्यातही क्रूझचा प्रवास करताना तो अधिक उत्कटत्वाने जाणवतो. आपण दूरवर समुद्रात जहाजात असतो आणि तिथून त्या शहराकडे पाहातो, तेव्हा हे परस्परांना समांतर जाणारे, सरळ आणि हरएक ठिकाणी काटकोनात जाणारे रस्ते डोळ्यांना दिसतात. तीच गोष्ट लॉस एन्जीलीस विमानतळावर आपले विमान उतरवताना अनुभवास येते. हेही इतर शहरांच्या बाबतही म्हणता येते. नगररचनेचे हे सौंदर्य म्हणूनच डोळ्यांना सुखावणारे असते..

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..