खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता ।।धृ।।
बागेतील फुले सुंदर
फुलपाखरांचे रंग बहारदार
मोहक इंद्र धनुष्याकार
निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता ।।१।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
भजन पुजन प्रभूचे
भक्ति-भाव मनाचे
उपवास करी देहशुद्धीचे
तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ।।२।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
गरिबासी मदतीचा भाव
दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव
घ्या इतरांच्या मनाचे ठाव
मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता ।।३।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
धनसंपत्ती गंगाजळ
मोहमोयांचे जाळ
षड्-रिपू विकार सकळ
विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता ।।४।।
खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता
सर्वत्र आहे प्रभू संचार
अणूरेणूत झाला साकार
ब्रह्मांडही त्याचा आकार
विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता ।।५।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply