‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे उर्मिलाने कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी तिने प्राप्त केली आहे. ‘श्रृंगारमणी’ हे टायटल सुद्धा मिळालं आहे. अभिनयासोबतच ती क्लासिकल डान्स शिकवण्याचे सुद्धा काम करत असते.
२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी महेश कोठारे हे नवीन चेहऱ्याचा शोघ घेत होते. त्यासाठी उर्मिला कामासाठी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी महेश कोठारे यांचे चिरंजीव आदिनाथ कोठारे तिच्या प्रेमात पडले. तिची नायिका म्हणून ती पहिली फिल्म होती. व ते त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होते. एकमेकांशी बरीच वर्ष डेट केल्यावर मग २० डिसेंबर २०११ ला ते विवाहबद्ध झाले. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे. झी मराठीवर दाखविल्या गेलेल्या असंभव या मालिकेत तिची महत्त्वाची भूमिका होती. उर्मिला कानेटकरला मला आई व्हायचयं या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार, व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा चित्रभूषण पुरस्कार मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply