नवीन लेखन...

अमेरिकेतील वृक्ष-वेली..

अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात.

पण निसर्गसौंदर्याच्या बाबतीत या भागाचे खास वेगळेपण आहे. त्याचबरोबर इथली जमीन कसदार आहे. इथे काही लावले तर ते सहज रुजते. अर्थात या हवामानाशी सुसंगत मात्र ते हवे. केळी, फणस किंवा शेवगा यासारखी झाडे इथे तग धरू शकत नाहीत.

एरव्ही ही जमीन fertile आहे. त्यामुळे निसर्गाची उधळण इथे नेहमीच चाललेली असते. ते रंग आणि आकार पाहिल्यावर विधात्याची किमया पाहून आपण अचंबीत होतो.

परवा नेटफ्लिक्सवर काही डॉक्यूमेंटरीज पाहात होतो. आफ्रिका, चीन, तिबेट या भागातील वन्यजीवनासंबंधी त्या होत्या. त्यात चीनमधील जंगलात निर्माण होणाऱ्या नयनमनोहर वनस्पतींविषयी माहिती देताना निवेदक सांगत होता की अलीकडेच या खजिन्याचा मानवाला शोध लागला आणि इथून मग त्या वनस्पती ज़गभर पोहोचल्या. अमेरिकेतल्या वृक्ष, वेली, फुलझाडांची विविधता आणि विलोभनीय रूपे पाहिल्यावर हे सारे ठिकठिकाणाहून गोळा करून इथे आणले असावे याची जाणीव झाली. गुलाब, मोगरा, झेंडू या काही जाती आपल्याकडेही होतात, त्या आपण सहज ओळखतो. पण इथे असलेल्या असंख्य जातींची झाडे, वेली यांची मोजणी कशी करता येईल? काय काय त्यात आहे याचे मोजमाप कोण करणार? एक खरे की हे सारे आंतरिक आस्थेमुळे आणि सौंदर्यदृष्टीमुळे एकाच ठिकाणी पाहायला मिळते.

अमेरिकनांचा एक गुण खरेच वाखाणण्याजोगा आहे आणि तो म्हणजे रसिकता. आपल्या घराभोवताली सुंदर फुलझाडांचे ताटवे रांगेत लावावेत, त्यांना नियमित खत, पाणी मिळेल हे पाहावे या बाबतीत ही मंडळी अतिशय जागरूक दिसतात. आपण कुठल्याही मॉल्समध्ये जात असू, त्याच्या एका कोपऱ्यात किंवा दर्शनी भागात फुलझाडे विक्रीसाठी ठेवलेली हमखास आढळतात. ती खरेदी करणारेही अनेक दिसतात.

हे केवळ वैयक्तिक पातळीवरच होते असे समजण्याचे कारण नाही. सर्व रस्ते, सार्वजनिक बागा, मैदाने-मोकळ्या जागा फुलझाडांनी सजवलेल्या असतात आणि नित्य त्यांची निगराणीही केली जाते. ज्याला आपण social awareness म्हणतो, तो इथल्या माणसांमध्ये खूप आढळतो. त्यामुळे झाडा-वेलींचे जतन होते. मी स्वत: काही वनस्पतीशास्त्रज्ञ नाही. पण माझ्यापाशी सर्वसामान्य माणसाला जितकी संवेदनक्षमता असते तेवढी आहे. त्यामुळे या झाडांची, वेलींची रंगसंगती, आकारांतील विविधता, सौंदर्य यासंदर्भात कितीतरी वैशिष्ट्ये भावतात आणि त्यामुळे आत्म्याला विलक्षण आनंद होतो.

आपल्या साऱ्या हक्क संवेदना समृद्ध करणारी आणि श्रेष्ठ प्रकारच्या आत्मीक आनंद देणारी निसर्गातील रंगांची उधळण आजूबाजूला आहे ही जाणीवही अत्यंत सुखावह असते.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..